लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या चर्चा वारंवार रंगल्या, परंतु दोघांकडून अद्यापही दुजोरा आलेला नाही. पण, त्यांच्या सोबत असण्याच्या अनेक पुराव्यांनी त्या चर्चा सुरूच आहेत.
भारताचा फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि त्याच्यासोबत आथियाही ( Athiya Shetty) असल्याचे पुरावे समोर आले आहेत.
सोशल मीडियावर या दोघांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे हे समोर आले आहे आणि त्यामुळे ते दोघंही एकत्र राहत असल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर भारतीय खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी मिळाली आहे आणि लोकेशनं इंग्लंडमधील भटकंतीचे फोटो पोस्ट केले आहेत.
अशियाही सध्या लंडनमध्येच आहे आणि लोकेश व तिच्या नव्या जाहीरातीचं शूटींगही तेथेच झाले आहे. तिनेही लंडनमध्ये भटकंती करत असल्याचे अनेक फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमुळेच लोकेश व आथिया सोबतच असल्याचे समोर आले आहे. लोकेश व आथियानं पोस्ट केलेल्या फोटोत एक कॉमन मैत्रीण दिसत आहे.