Join us

खुद्द सुनील शेट्टींनीच मोलाची मदत केली; अशी फुलली राहुल अन् अथियाची लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 17:20 IST

Open in App
1 / 8

बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू लोकेश राहुल त्यांच्या अफेअरमुळे बऱ्याच महिन्यांपासून चर्चेत आहेत. बऱ्याच कालावधीपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. आता दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त आहे.

2 / 8

येत्या हिवाळ्यात अथिया आणि राहुल लग्नाच्या बेडीत अडकतील अशी शक्यता आहे. अथिया आणि राहुलच्या रिलेशनशीपची चर्चा तशी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र दोघांनी कायमच याबद्दलचे प्रश्न टाळले. या दोघांची लव्ह स्टोरी कशी फुलली, याची गोष्ट रंजक आहे.

3 / 8

राहुल आणि अथियाची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली. दोघांनी एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली, तेव्हा दोघांमध्ये काहीतरी 'सुरू' असल्याच्या चर्चा ऐकू येऊ लागल्या.

4 / 8

अथियाचे वडील म्हणजेच सुनील शेट्टी यांनी दोघांना अप्रत्यक्षपणे बरीच मदत केली. अथिया आणि राहुल यांना त्यांचं नातं प्रायव्हेट ठेवायचं होतं. त्यामध्ये सुनील शेट्टींची कायमच मदत झाली. सुनील शेट्टींना जेव्हा जेव्हा रिलेशनशीपबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी या केवळ माध्यमांमधल्या चर्चा असल्याचं सांगितलं.

5 / 8

राहुल कसोटी मालिकेसाठी भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असताना त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अथियादेखील तिथे गेली होती. दोघांनी नात्याबद्दल बोलणं टाळलं. मात्र सोशल मीडियावर त्यांचे फोटो पाहून अनेकांना जे समजायचं ते समजलंच.

6 / 8

अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राहुलनं तिच्यासोबतचं नातं इन्स्टाग्रामवर जाहीरपणे सांगितलं. राहुलनं अथियासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला होता आणि त्याला अतिशय स्पेशल कॅप्शन दिलं होतं.

7 / 8

अथियाचा भाऊ अहानच्या तडप सिनेमाच्या स्क्रीनिंगला राहुल आणि अथियानं एका कपलप्रमाणे एंट्री घेत रिलेशनशिपच्या चर्चांवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केलं. दोघांनी फोटोग्राफर्ससमोर अनेक पोझही दिल्या. त्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.

8 / 8

कतरिना कैफ, आलिया भट्ट यांचे लग्न सोहळे नुकतेचं संपन्न झाले. त्यामुळे आता चाहत्यांना राहुल आणि अथियाच्या लग्नाची उत्सुकता आहे. या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्न बंधनात अडकू शकतात.

टॅग्स :लोकेश राहुलअथिया शेट्टी सुनील शेट्टी
Open in App