Asia Cup Most Sixes Record : इथं हिटमॅन रोहितच षटकारांचा राजा; पाहा आघाडीच्या ५ फलंदाजांचा रेकॉर्ड

टॉप ५ मध्ये हिटमॅन रोहितसह या भारतीयाचं नाव, पण...

आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांच्या यादीत हिटमॅन रोहित शर्मा टॉपला आहे.

रोहित शर्मासह सुरेश रैनानं आशिया कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. पण हे दोघेही यावेळीच्या स्पर्धेत टीम इंडियाचा भाग नाहीत. कारण रोहित शर्मा कसोटीसह टी-२- क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर फक्त वनडे खेळणार आहे.

सुरेश रैनानं १५ ऑगस्ट २०२० मध्ये धोनीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती.

आशिया कप स्पर्धेत रोहित शर्मानं ३७ सामने खेळले आहेत. यात त्याच्या भात्यातून ४० षटकार पाहायला मिळालेत. त्याचा हा रेकॉर्ड बराच काळ अबाधित राहिल असेच दिसते.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अन् स्फोटक बॅटर अशी ओळख असलेल्या शाहिद आफ्रिदीनं आपल्या कारकिर्दीत आशिया कप स्पर्धेत २३ सामने खेळताना २६ षटकार मारले आहेत.

श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आशिया कप स्पर्धेत त्याने २५ सामन्यात २३ षटकार मारले आहेत.

सुरेश रैनानं २००८ ते २०१२ या कालावधीत आशिया कप स्पर्धेत १३ सामने खेळताना १८ षटार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी हा एकमेव असा फलंदाज आहे. जो यंदाच्या हंगामातही खेळताना दिसणार आहे. आतापर्यंत त्याने १९ सामन्यात १५ षटकार मारले आहेत. यंदाच्या आशिया कप स्पर्धेत तो अफगाणिस्तानकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.