Asia Cup 2022 Ind vs Pak Playing XI : 'पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल याचा निर्णय घेतलेला नाही. श्रीलंका व अफगाणिस्तान यांचा सामना दुबईच्या याच मैदानावर होत आहे. हा सामना कसा रंगतो हे आम्हाला पाहायचे आहे आणि त्यावरच आम्ही प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेऊ, 'असे रोहित शर्मा काल पत्रकार परिषदेत म्हणाला होता.
अफगाणिस्तानची कामगिरी पाहून एव्हाना भारतीय संघाचा कॅप्टन रोहितने पाकिस्तानविरुद्धची प्लेइंग इलेव्हन पक्की केली असेल. अफगाणिस्तानने आशिया चषक २०२२ ची सुरुवात दणक्यात केली. श्रीलंकेचे १०६ धावांचे लक्ष्य १०.१ षटकांत पार केले.
फझलहक फारूकीने ३ विकेट्स घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले आणि त्यानंतर रहमानुल्लाह गुर्बाझने १८ चेंडूंत ४० धावा चोपल्या. त्याने हझरतुल्लाह झजाईसह पहिल्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी करून विजय पक्का केला.
अफगाणिस्तानने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला. कर्णधार मोहम्मद नबी ( २-१४) व मुजीब उर रहमान ( २-२४) यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत धक्के दिले. फारुकीने ( ३-११) सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
अफगाणिस्तान ३ फिरकीपटूसह खेळला. भारतीय संघाची पण हिच रणनीती असेल, परंतु रोहित २ फिरकी गोलंदाज घेऊन मैदानावर उतरणे पसंत करेल
रविंद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल व रवी बोश्नोई असे चार पर्याय त्याच्याकडे आहेत. यापैकी चहलचे स्थान पक्के मानले जात आहे. अशात रोहित ६-२-३ या कॉम्बिनेशनने उतरू शकतो. म्हणजेच ६ फलंदाज, २ अष्टपैलू व ३ गोलंदाज असा संघाचा फॉरमॅट असू शकतो.
लोकेश राहुल व रोहित शर्मा हे ओपनिंग करतील असा अंदाज आहे. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक अशी क्रमवारी असेल.
रविंद्र जडेजा हा दुसरा अष्टपैलू संघात खेळू शकतो किंवा आर अश्विनला संधी मिळू शकते. त्यानंतर भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल व अर्षदीप सिंग हे गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन - लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा/आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल व अर्षदीप सिंग.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंह, आवेश खान.