मुशफिकर रहिमने या सामन्यात झुंजार १४४ धावा केल्या. या स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. भारताच्या विराट कोहलीने १८३ धावांची खेळी यापूर्वी साकारली होती.
या स्पर्धेतील बांगलादेशचा हा सातवा विजय आहे. आतापर्यंत त्यांना ३६ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.
बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेची ही सर्वात कमी धावसंख्या (१२४) आहे. यापूर्वी बांगलादेशने २००९ साली श्रीलंकेला १४७ धावांत सर्वबाद केले होते.
यापूर्वी युएईमध्ये बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध पाच सामने जिंकले होते. सहाव्या सामन्यांत त्यांना हा पहिला विजय मिळाला आहे.