अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर-19 संघात निवड

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात निवड झाली आहे.

17 वर्षीय अर्जुन तेंडुलकर जे.वाय लेले इंडिया इन्व्हिटेशनल वन डे स्पर्धेत मुंबईकडून खेळणार आहे.

बडोद्यात 16 ते 23 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी अर्जुन मुंबईच्या चौदा वर्षांखालील आणि सोळा वर्षांखालील संघाकडून खेळला आहे.

याआधी अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील संघातून खेळला आहे.