Mumbai Indians मधून बाहेर का पडलास? Arjun Tendulkar ने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला...

Arjun Tendulkar on Mumbai Indians Exit, IPL 2026: अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सच्या संघाने फार संधी दिली नव्हती

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या IPL 2026 मध्ये खेळत असल्याने चर्चेत आहे. यंदाच्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने त्याला खरेदी केले.

अर्जुन तेंडुलकरला पहिल्यांदा २०२१मध्ये २० लाखाला खरेदी केले. त्यानंतर २०२५पर्यंत तो ३० लाखांच्या मानधनावर होता. त्यानंतर त्याच किमतीत त्याला लखनौने खरेदी केले.

मुंबई इंडियन्समध्ये असताना अर्जुन तेंडुलकरने बड्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर केली. त्याला अनेक धडे मिळाले पण अनुभवी खेळाडूंमुळे संघात खेळायची संधी मिळाली नाही.

त्यानंतर आता मुंबई इंडियन्स सोडून दुसऱ्या संघात जाण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल अर्जुनने पहिल्यांदाच भाष्य केले. एका पॉडकास्टमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

अर्जुन तेंडुलकर म्हणाला, "मुंबई इंडियन्स हे एका कुटुंबासारखे आहे आणि तिथून मी खूप काही शिकलो. पण करिअरच्या या टप्प्यावर मला नियमित सामने खेळण्याची गरज आहे."

"कोणत्याही खेळाडूला सतत संघाबाहेर बेंचवर बसून राहायला आणि सामने पाहत बसायला आवडत नाही. प्रत्येकाला मैदानात उतरायची इच्छा असते. मलाही तशी इच्छा आहे."

"अशी वेळी मला वाटले की माझ्या प्रगतीसाठी दुसऱ्या संघात जायला हवे. तिथे कदाचित मला अपेक्षित संधी मिळू शकेल," असे अर्जुन तेंडुलकर म्हणाला.