Join us  

IPL 2021 अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळणार?; मुंबईच्या सीनिअर संघातील पदार्पणानं चक्र फिरणार

By स्वदेश घाणेकर | Published: January 16, 2021 8:38 AM

Open in App
1 / 7

महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) यानं शुक्रवारी मुंबईच्या सीनिअर संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेत पदार्पण केले. अर्जुन तेंडुलकरसाठी हा खूप मोठा क्षण ठरला. भारतीय संघाच्या नेट्समध्ये आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत सराव करण्याची संधी अर्जुनला अनेकदा मिळाली आहे.

2 / 7

अर्जुन आता इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) नेट्समध्ये नाही तर प्रत्यक्ष संघाकडून खेळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईच्या सीनिअर संघातील पदार्पण हे त्यादिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे.

3 / 7

अर्जुनचे हे पदार्पण मुंबई संघासाठी फार फलदायी ठरले नाही. मुंबईला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून संघ जवळपास बाहेर फेकला गेला आहे. मुंबईला दिल्लीकडून ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला, तर केरळनं ८ विकेट्स राखून त्यांच्यावर मात केली.

4 / 7

शुक्रवारी झालेल्या सामन्यात हरयाणानं ८ विकेट्स राखून विजय मिळवला. मुंबईला १९.३ षटकांत सर्वबाद १४३ धावा करता आल्या. प्रथम फलंदाजी करताना मुंबईचे सहा फलंदाज ५६ धावांवर माघारी परतले होते. यशस्वी जैस्वालनं २१ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ३५ धावा केल्या. सर्फराज खान ( ३०) व अथर्व अंकोलेकर ( ३७) यांनी सातव्या विकेटसाठी दमदार कामगिरी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.

5 / 7

सचिन तेंडुलकरनं मुंबईसाठी अखेरचा सामना हरयाणाविरुद्ध खेळला होता आणि आज अर्जुननं हरयाणाविरुद्ध मुंबईच्या सीनिअर संघाकडून पदार्पण केलं. त्याच्या पहिल्या षटकात 15 धावा चोपल्या, परंतु दुसऱ्याच षटकात त्यानं हरयाणाच्या सी के बिश्नोईला बाद केलं. अर्जुननं या सामन्यात ३४ धावांत १ विकेट घेतली.

6 / 7

मुंबईच्या सीनिअर संघातील पदार्पणामुळे अर्जुनसाठी IPLचे दरवाजे उघडले आहेत. आयपीएल २०२१ साठी होणाऱ्या लिलावातील पूलमध्ये आता अर्जुनचा समावेश होऊ शकतो. त्याची कामगिरी साजेशी झालेली नाही, हेही तितकेच खरे असले तरी त्याला मुंबई इंडियन्स आपल्या ताफ्यात घेतात का, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.

7 / 7

यंदाच्या लिलावात त्याला ताफ्यात घेण्यासाठी कुणीच उत्सुकता दाखवली नाही, तरी २०२२च्या मेगा ऑक्शनमधून तो नक्की आयपीएलमध्ये पदार्पण करू शकेल.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकरआयपीएलमुंबई इंडियन्स