Join us

Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 23:50 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची साखरपुडा झाला आहे. अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा रवी घई यांची नात सानिया चांडोकशी झाला आहे.

2 / 8

मुंबईमध्ये अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा झाला. या समारंभात दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र उपस्थित होते. घई कुटुंब हे मुंबईमधील एक मोठे उद्योगपती आहे.

3 / 8

साखरपुडा थाटामाटात आयोजित करण्यात आला नव्हता. सानियाचे कुटुंब मुंबईतील प्रसिद्ध उद्योजकांचे कुटुंब आहे. घई हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरीज असलेले आईस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत.

4 / 8

सानिया चांडोक ही उद्योगपती रवी घई यांची नात आहे. ती सारा तेंडुलकर हिची खास मैत्रिण असल्याचे दिसत आहे.

5 / 8

सोशल मीडियावर सारा तेंडुलकर आणि सानिया चांडोक हिचे फोटो व्हायरल झाले आहे. अनेक व्हिडीओंमध्येही या दोघी एकत्र दिसत आहेत.

6 / 8

सानिया चांडोक आणि सारा तेंडुलकर या दोघींचे रील्स व्हायरल आहेत. यामध्ये सारा तेंडुलकर सानियाची ओळख जवळची मैत्रिण असल्याची सांगत असल्याचे दिसत आहे.

7 / 8

बॉलिंग अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी एकूण पाच सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने तीन विकेट्स घेतल्या आहेत.

8 / 8

अर्जुनला आयपीएलमध्ये फक्त एकाच सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली, यामध्ये त्याने ९ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १३ धावा केल्या. अर्जुनने २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकर