Join us  

फॅन्ससोबत चॅट करत होता विराट कोहली, तेवढ्यात अनुष्काने विचारलं, ‘माझा हेडफोन कुठं ठेवलाय?’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:50 AM

Open in App
1 / 8

भारतीय कसोटी संघ २ जून रोजी इंग्लंडला जाण्यासाठी टेकऑफ करणार आहे. त्याआधी संपूर्ण संघ मुंबईत कोरोना नियमांनुसार क्वारंटाइन आहे. मग याच क्वारंटाइन कालावधीत विराट कोहलीनं त्याच्या फॅन्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून गप्पा मारल्या.

2 / 8

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विराटनं त्याच्या फॅन्ससोबत संवाद साधला आणि चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्कानंही त्याला हटके प्रश्न विचारला

3 / 8

अनेक फॅन्स विराटला विविध विषयांवर प्रश्न विचारत होते. त्यात अनुष्कानंही संधी साधली पण तिनं विराटला क्रिकेट किंवा त्याच्यासंबंधी प्रश्न विचारला नाही. तर अनुष्काचा प्रश्न तिच्या हेडफोन संदर्भात होता.

4 / 8

अनुष्कानं विराटला लाइव्ह चॅट शोमध्ये माझा हेडफोन कुठंय? असा प्रश्न विचारला आणि कोहलीची एकच धमाल उडवून दिली.

5 / 8

विराट कोहलीनंही अनुष्काला उत्तर दिलं. बेडच्याजवळ साइड टेबल आङे. त्यावर हेडफोन ठेवलाय, असं विराट म्हणाला. विराट-अनुष्काच्या या नटखट अंदाजावर फॅन्सचाही लाइक्सचा पाऊस पडला आहे.

6 / 8

विराट तू मोकळ्या वेळात काय करतो, असं प्रश्न विचारल्यावर, अनुष्कासोबत काही टीव्ही शो पाहतो, असं उत्तर दिलं.

7 / 8

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (WTC Final 2021) होणार आहे. येत्या १८ जून ते २३ जूनदरम्यान इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टनमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.

8 / 8

दरम्यान, या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ याआधीच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तर भारतीय संघ येत्या २ जून रोजी इंग्लंडसाठी रवाना होणार आहे

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारतीय क्रिकेट संघ