वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आंद्रे रसेलनं क्रिकेटच्या मैदानात आपली खास छाप सोडलीये. नुकतीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
कॅरेबियन क्रिकेटरच्या निवृत्तीनंतर त्याची लाइफ पार्टनर देखील चर्चेचा विषय ठरत आहे.
इथं जाणून घेऊयात कॅरेबियन क्रिकेटरच्या हॉट अँण्ड ब्युटीफुल वाइफीसंदर्भातील खास गोष्टी
'मसल पॉवर' रसेल हा मैदानातील त्याच्या खास कामगिरीशिवाय स्टायलिश लूकमुळेही चर्चेत राहणारा चेहरा आहे. स्टाईल स्टेटमेंटच्या बाबतीत त्याची पत्नीही काही कमी नाही.
आंद्रे रसेल याच्या पत्नीचे नाव जॅसिम लोरा असं आहे. ती अमेरिकन फॅशन मॉडेल आणि ब्लॉगर आहे.
२०१४ मध्ये या दोघांची पहिली भेट झाली. एका खासगी कार्यक्रमातील भेटीनंतर दोघांच्या प्रेम फुलले. याच वर्षी दोघांनी साखरपुडा उरकला.
आंद्रे रसेल आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसतो. त्याची पत्नी अनेकदा IPL दरम्यान त्याला चीअर करतानाही दिसली आहे.
२०१६ मध्ये आंद्रे रसेल आणि जेसिम लोरा ही जोडी लग्नबंधनात अडकली. दोघांना एक मुलगी आहे. जिचं नाव आलिया रसेल असं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली जेसिम लोराही परफेक्ट स्टाइल स्टेटमेंटशिवाय हॉट अँण्ड बोल्ड फोटोमुळेही सातत्याने चर्चेत राहणारा चेहरा आहे.