Join us

बुमराहची पत्नी आपल्या 'वाणी'ने गाजवणार वर्ल्ड कप; संजनाच्या ग्लॅमरस लूकने वेधले लक्ष, Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 17:46 IST

Open in App
1 / 7

यूएईच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. तीन तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेसन आपल्या वाणीने विश्वचषक गाजवण्यासाठी सज्ज आहे. संजना यूएईत होत असलेल्या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी दाखल झाली आहे.

2 / 7

६ मे १९९१ रोजी जन्मलेली संजना गणेसन ही प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. ती मॉडलिंग देखील करायची. ती अनेकदा भारतातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समालोचन करताना दिसते.

3 / 7

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेसनची पहिली भेट २०१३ च्या आयपीएल दरम्यान झाली होती. त्यावेळी संजनाने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली होती. आता संजनाची सहकारी Crystal Arnold ने दोघींचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

4 / 7

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेसनची पहिली भेट २०१३ च्या आयपीएल दरम्यान झाली होती. त्यावेळी संजनाने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली होती.

5 / 7

२०२१ मध्ये जेव्हा जसप्रीत बुमराहला वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली तेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी पहिल्यांदाच समोर आली होती.

6 / 7

लग्नानंतर दोघांनी एकत्र फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली. लग्नाआधी जसप्रीत आणि संजना दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात लग्न केले.

7 / 7

संजना आणि जसप्रीत यांना एक मुलगा असून त्याचे नाव अंगद असे आहे.

टॅग्स :संजना गणेशनजसप्रित बुमराहट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024ऑफ द फिल्ड