१ मार्च ते ३ मार्च या कालावधीत गुजरातमधील जामनगर येथे सेलिब्रिटींचा मेळावा भरला. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या विवाहपूर्व सोहळ्याला विविध क्षेत्रातील नामाकितांनी हजेरी लावली.
क्रीडा विश्वापासून बॉलिवूड कलाकारांसह उद्योग जगतातील मोठी नावं या सोहळ्यासाठी उपस्थित होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकरसह दिसला.
तीन दिवस गुजरातमधील जामनगर येथे सेलिब्रिटींचा मेळावा भरला होता. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार, नेते मंडळींनी हजेरी लावली.
क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यातील क्रिकेटपटूंचा पारंपारिक पेहराव चर्चेचा विषय ठरला. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अंबानी कुटुंबीयांसह सहकारी खेळाडू ड्वेन ब्राव्होसोबत दांडिया खेळण्याचा आनंद लुटला.
सचिन तेंडुलकरने अंबानींच्या सोहळ्यातील झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'प्रत्येक क्षणाला उत्सव बनवणारं जामनगर', अशा आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे.
सचिनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अंजली आणि सारा तेंडुलकर या देखील दिसत आहेत.
अनंत अंबानी यांचा विवाहपूर्व सोहळा तीन दिवस चालला. त्यांचे मुंबईत लग्न होणार आहे. फेसबुकच्या मालकांपासून बिल गेट्स हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
राधिका मर्चंट ही अनंत अंबानी यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे. राधिकाचा जन्म हा १८ डिसेंबर १९९४ मध्ये झाला. ती उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी दोघेही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते गुगलचे सुंदर पिचई असे सर्व मोठे उद्योगपती, उद्योजक या सोहळ्याला उपस्थित होते.