क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळी सध्या गुजरातमधील जामनगर येथे पोहोचत आहेत. गुजरातमधील जामनगर येथे सेलिब्रिटींचा मेळावा भरला आहे. क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळींनी खास सोहळ्यासाठी हजेरी लावली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार, नेते मंडळींनी पोहोचत आहेत. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्होसह इतरांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याला उपस्थिती दर्शवली आहे.
भारतीय क्रिकेटमधील अनेक शिलेदारही या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. बॉलिवूड कलाकारांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांचा मेळावा जामनगरच्या धरतीवर भरला आहे.
किरॉन पोलार्डसह इतर खेळाडूंनी बॉलिवूड कलाकार शाहरूख खान आणि रणवीर सिंगसोबत फोटो खेचला. या सोहळ्यातील फोटो समोर आले आहेत.
१ मार्च ते ३ मार्चपर्यंत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी अनेकजण जामनगरला येत आहेत. या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते गुगलचे सुंदर पिचई असे सर्व मोठे उद्योगपती, उद्योजक या सोहळ्याला उपस्थित आहेत. १ ते ३ मार्च असा हा तीन दिवसांचा सोहळा असणार आहे.
राधिका मर्चंट ही अनंत अंबानी यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे. राधिकाचा जन्म हा १८ डिसेंबर १९९४ मध्ये झाला. ती उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी दोघेही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.