RCB Will Jacks girlfriend Ana Brumwell Photos: IPL 2024 मधील स्फोटक फलंदाजीनंतर सर्वत्र विल जॅक्सची चर्चा होत आहे. विल जॅक्स हा T20 लीगमधील मोठे नाव आहे पण IPLमध्ये तो पहिल्यांदाच खेळत आहे.
सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर जॅक्स फॉर्मात आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध विल जॅक्स तुफान फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पुढे १० चेंडूत शतक गाठले.
विल जॅक्सच्या या दमदार फलंदाजीनंतर त्याच्या नावाची तर चर्चा सुरु आहेच, पण त्यांच्यासोबतच आता त्याची गर्लफ्रेंडही चर्चेत आली आहे.
विल जॅक्सची गर्लफ्रेंड कोण आहे, जाणून घ्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिग्गज फलंदाज विल जॅक्सच्या गर्लफ्रेंडचे नाव ॲना ब्रुमवेल. 24 वर्षांची ब्रुमवेल लंडनमध्ये राहते आणि तिथेच शिकते.
ॲना ब्रुमवेल विद्यार्थी तर आहेच. त्यासोबत लोकांना मदत करण्यातही ती पुढे असते. मुलांच्या शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या NGO सोबत ती काम करते.
ब्रुमवेलला प्रवासाची खूप आवड आहे. इंस्टाग्राम वर अनेक फोटोंमधून ही गोष्ट स्पष्ट होते. तिने जगातील अनेक देश पालथे घातले असून त्यांचे फोटो शेअर केले आहेत.
ॲना सध्या विल जॅक्स सोबत IPL साठी भारतात आहे. इथे ती देशी पद्धतीत एन्जॉय करताना दिसत आहेत. बेंगळुरू येथील इस्कॉन मंदिरात ती दर्शनासाठी गेली होती. यासोबतच ती कुंभारकाम करतानाही दिसली.
ॲना RCBच्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्येही दिसली. तिचा विल जॅक्स सोबतही फोटो व्हायरल झाला होता. ती इतर लीगमध्येही जॅक्सला सपोर्ट करतानाही दिसते.
सर्व फोटो सौजन्य- Ana Brumwell Instagram