काही दिवसांपूर्वी शास्त्री यांनी पंतला ताकिद दिली होती.
जर पंत असाच खेळत राहीला तर त्याला संघात स्थान मिळणार नाही, असे शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
पंत जेव्हा चुकला तेव्हा त्याच्यावर मी टीका केली होती, असेही शास्त्री म्हणाले.
शास्त्री म्हणाले की, जर एखाद्या खेळाडूचे काही चुकत असेल तर त्याबाबत बोलणे हे माझे कर्तव्य आहे. मला संघात तबला वाजवायला ठेवलेले नाही.
जेव्हा पंतला गरज असेल तेव्हा नक्कीच आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असे शास्त्री यांनी सांगितले.
एका खास मुलाखतीच्या वेळी शास्त्री संतापलेले पाहायला मिळाले.
त्यांनी काही दिवसांपूर्वी एका खेळाडूबाबत वक्तव्य केले होते. पण याच खेळाडूबाबत त्यांनी विरोधी वक्तव्य केले.
मी संघात काय तबला वाजवायला आहे का, असा संतापजनक प्रश्न शास्त्री यांनी विचारला आहे.