इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. पण, या सामन्यात कॅमेरामनच्या कॅमेरात कैद झालेल्या मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली.
चेन्नई सुपर किंग्सकडून महेंद्रसिंग धोनीने अर्धशतकी खेळी करताना ३८ चेंडूंत ५० धावा केल्या. धोनीने या खेळीत ७ चौकार व १ षटकार खेचला. चेन्नईचा निम्मा संघ ६१ धावावर माघारी परतल्यावर कॅमेरामनने ही सुंदर तरूणी कॅमेरात टिपली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही तरुणी कोण हे समोर आले आहे,, तिने स्वतः ट्विटरवर तिच्या नावाने फिरणारे मीम्स शेअऱ केले आहेत,
या मिस्ट्री गर्लचे नाव देविका नायर ( Devika Nair) आहे आणि ती प्रोफेशनल डिजिटल मार्केटर आहे.
देविकाने हे मीम्स शेअर केल्यानंतर तिच्या फॉलोअर्सची संख्याही वाढली... ते आता २२.९ हजार इतके झाले आहेत.