Join us

"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 19:21 IST

Open in App
1 / 7

स्पर्धा आता रोमांचक वळणावर आहे. प्लेऑफचे चित्रही हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदा स्पर्धेतून सर्वप्रथम बाहेर झाला.

2 / 7

ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर महेंद्रसिंग धोनीला संघाचा कर्णधार करण्यात आले. पण तरीही संघाच्या कामगिरीमध्ये फारसा फरक पडला नाही. १० सामन्यांनंतरही CSK शेवटच्या स्थानावरच आहे.

3 / 7

याचदरम्यान, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धोनीचे नाव घेत संताप व्यक्त केला. आयपीएलमधील काही नियम अचानक बदलण्यात आले. या नियमावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

4 / 7

सुनील गावस्कर म्हणाले, 'धोनीसाठी अनकॅप्ड खेळाडूंच्या रकमेत वाढ करण्यात आली आणि त्यांना कमीत कमी ४ कोटी मिळतील असे ठरवले गेले. हा नियम बदलणे क्रिकेटसाठी हानिकारक आहे.'

5 / 7

'आयपीएल २०२५च्या हंगामापूर्वी, अनकॅप्ड खेळाडू नियम परत आणण्यात आला होता, ज्या अंतर्गत पाच वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूंना 'अनकॅप्ड' ठरवण्यात आले.'

6 / 7

'जास्त पैसे दिल्याने खेळाडूंची क्रिकेटची आवड आणि टीम इंडियासाठी खेळण्याची भूक कमी होऊ शकते. याचा फ्रँचायझीवर परिणाम होणार नाही, पण भारतीय क्रिकेटचे नुकसान होऊ शकते.'

7 / 7

'IPLच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात कधीच एखाद्या अनकॅप्ड खेळाडूला सरसकट एवढी मोठी रक्कम दिली जात नव्हती. खेळाडूंच्या भविष्याच्या दृष्टीने ही घातक बाब आहे,' असेही गावसकर म्हणाले.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सुनील गावसकरचेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२४