All the squads for ICC Men's T20 World Cup 2022 : १६ पैकी १२ संघ झाले जाहीर, जग जिंकण्यासाठी सारेच सज्ज; भारतासमोर तगडे आव्हान

All the squads for ICC Men's T20 World Cup 2022 - ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वर्ल्ड कप पार पडणार आहे. आतापर्यंत १६ पैकी १२ संघांनी त्यांचे संघाची घोषणा केली आहे. भारताच्या ग्रुप ब मधील चारही संघांनी तगडे खेळाडू मैदानावर उतरवले आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर कडवे आव्हान असणार आहे.

एडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२च्या Super 12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळावे लागेल. ओमान ( फेब्रुवारी) आणि झिम्बाब्वे ( जून व जुलै) येथे दोन पात्रता स्पर्धा होणार आहेत आणि त्यातून संघ पहिल्या राऊंडमध्ये Super 12मधील अंतिम चार संघांसाठी एकमेकांना आव्हान देतील.

नामिबिया - गेर्हार्ड इरास्मस ( कर्णधार), जेजे स्मित, डिव्हान ला कॉक, स्टीफन बार्ड, निकोल लॉफ्टी, इटन, जेन फ्रेलिंक, डेव्हिड वीज, रुबेन ट्रुम्पलमन, झेन ग्रीन, बेर्नार्ड स्कोल्ट्ज, टँगेनी, लुंगामेनी, मिचेल व्हॅन लिंगेन, बेन शिकोंगो, कार्ल बर्लकेनस्टॉक, लोहान लॉरेन्स, हेलाओ या फ्रान्स

नेदरलँड्स - स्कॉट एडवर्ड्स ( कर्णधार), कॉलिन एकरमन, शारीज अहमद, लोगान व्हॅन बीक, टॉम कुपर, ब्रेंडन ग्लोव्हर, टीम व्हॅन डेर गटन, फ्रेड क्लासेन, बॅस डे लीड, पॉल व्हॅन मिकेरेन, रॉलेफ व्हॅन डेर मेर्व्हे, स्टीफन मायबर्ग, तेजा निदामनुरू, मॅक्स ओ'डोव, टीम प्रिंग्ले, विक्रम सिंग.

श्रीलंका व संयुक्त अरब अमिराती यांनी अद्याप संघ जाहीर केलेले नाहीत.

आयर्लंड, झिम्बाब्वे व स्कॉटलंड यांनी अद्याप संघ जाहीर केलेले नाहीत.

वेस्ट इंडिज - निकोलस पूरन ( कर्णधार), रोव्हमन पॉवेल ( उप कर्णधार), यानिक चारिआह, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कोट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एव्हिन लुईस, कायले मेयर्स, ओबेड मॅकॉय, रेयमन रैफर, ओडीन स्मिथ

अफगाणिस्तान - मोहम्मद नबी ( कर्णधार), नजिबुल्लाह झाद्रान ( उप कर्णधार), रहमनुल्लाह गुर्बाझ, अझमतुल्लाह ओमार्झाइ, दारवीश रसूली, फारिद अहमद मलिक, फझल हक फारूकी, हझरतुल्लाह झजाई, इब्राहिम झाद्रान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, क्वैस अहमद, राशिद खान, सलिम साफी, उस्मान घानी; राखीव खेळाडू - अस्फार झजाई, शराफुद्दीन अश्रफ, रहमत शाह व गुलबदीन नैब

ऑस्ट्रेलिया - अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), अ‍ॅश्टन अ‍ॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

इंग्लंड - जॉस बटलर ( कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टोन, डेवीड मलान, आदील राशिद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, डेव्हिड विली, ख्रिस वॉक्स, मार्क वूड, अ‍ॅलेक्स हेल्स; राखीव - लिएम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टायमल मिल्स

न्यूझीलंडने अद्याप संघ जाहीर केलेला नाही

बांगलादेश - शाकिब अल हसन, सब्बीर रहमान, मेहिदी हसन मिराज, अफिफ होसैन, मोसाडेक होसैन, लिटन दास, यासीर अली, नुरूल हसन, मुस्ताफिजूर रहमान, सैफुद्दीन, तस्कीन, अहमद, एडाबोट होसैन, हसन महमूद, नजमूल होसैन, नसूम अहमद; राखीव - शोरीफूल इस्लाम, शक मेहेदी हसन, रिशाद होसैन, सौम्या सरकार

पाकिस्तान - पाकिस्तानचा संघ -बाबर आजम ( कर्णधार), शादाब खान ( उप कर्णधार), आसीफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर; राखीव - फाखर जमान, मोहम्मद हॅरीस, शाहनवाज दहानी

दक्षिण आफ्रिका - टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेनरीच क्लासेन, रिझा हेड्रीक्स, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्ट्जे, वेन पार्नेल, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, रिली रोसोव, तब्रेझ शम्सी, त्रिस्तान स्टुब्स; राखीव - बीजॉर्न फोर्टून, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो.

भारत- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग; राखीव - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

श्रीलंका - दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुनाथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, बानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वानिदू हसरंगा, महेश थिक्शाना, जेफ्री वांडरसे, चमिका करूणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लहिरू कुमारा, दिलशान मधुशंका, प्रमोद मधुशान; राखीव खेळाडू - ॲशेन बंडारा, प्रवीण जयविक्रेमा, दिनेश चंडीमल, बिनुरा फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो,

झिम्बाब्वे - क्रेग एरविन, बर्ल रेयान, चकाबवा रेगिस, चतारा तेंदाई, एव्हंस ब्रॅडली, जोंगवे ल्यूक, मदानडे क्लाईव्ह, मधिवीरे वेस्ली, मासकाडजा वेलिंग्टन, मुन्योंगा टोनी, मुजरबानी ब्लेसिंग, नागरवा रिचर्ड, सिकंदर रझा, विल्यम मिल्बा, शुम्बा मिल्टन, विलियम्स शॉन; राखीव खेळाडू - चिवांगा टनाका, काये इनोसेंट, कासुजा केव्हिन, मारूमणी तडिवानसे, न्याउची व्हिक्टर.