दहाव्या क्रमांकावर विक्रमी फिफ्टी! अलाना किंगनं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ती पहिलीच

जे कुणाला नाही जमलं ते तिनं करून दाखवलं

आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील कोलंबोच्या मैदानात रंगलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात बेथ मूनीच्या शतकासह अलाना किंग हिने नाबाद अर्धशतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील २९ वर्षीय महिला क्रिकेटरनं पाकिस्तानविरुद्धच्या खेळीसह क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचला आहे. जे आतापर्यंत कुणालाच जमलं नाही ते तिनं करून दाखवलं आहे.

अलाना किंग ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात बॉलिंग ऑलराउंडरच्या रुपात खेळते. उजव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्या छोरीनं दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावांची खेळी साकारली. महिला वनडे क्रिकेमध्ये दहाव्या क्रमांकावर येऊन अर्धशतक झळकवणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.

अलाना किंग ही बॅटिंगपेक्षा तिच्या गोलंदाजीसाठी ओळखली जाते. पण पाकिस्तान विरुद्ध संघ अडचणीत असताना तिने फलंदाजीतील धमक दाखवत ऐतिहासिक अर्धशतक झळकावले. वनडेतील तिची ही पहिली फिफ्टी ठरलीये. तेही विक्रमी

अलाना किंग ही WPL मध्ये यूपी वॉरियर्ज संघाच्या ताफ्यातून खेळताना दिसली होती. या फ्रँचायझीनं तिच्यासाठी ३० लाख रुपये मोजले होते.

अलाना किंग आणि बेथ मूनी या दोघींनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ९ व्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी रचली. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील नवव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील ही सर्वोच्च भागादीरी आहे. या जोडीनं एश्ले गार्डन आणि किम गार्थ यांनी सिडनीच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवव्या विकेटसाठी केलेल्या ७७ धावांचा विक्रम मोडीत काढला.