मंगळवारी रात्री भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला. त्यानंतर बुधवारी भारतीय संघाने पार्टी केल्याचे पाहायला मिळाले.
या पार्टीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि मनीष पांडे दिसत आहेत. त्याचबरोबर जसप्रीत बुमरा आणि श्रेयस अय्यरने काही फोटो शेअर केले आहेत.
श्रेयस अय्यरने कर्णधार कोहली आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
भारतीय संघाने व्यायाम केल्यानंतर जोरदार पार्टीही केल्याचे म्हटले जात आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक सेल्फी काढला असून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
भारताचा फलंदाज मनीष पांडेही या गोष्टीत पिछाडीवर नाही. त्यानेही आपाला एक फोटो पोस्ट केला आहे.
भारताचा युवा वेगवान गोलंददाज शार्दुल ठाकूरनेही संघातील खेळाडूंबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.
कर्णधार विराट कोहलीनेही आपला एक खास फोटो यावेळी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.