Join us

इशान किशनचा पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड अन् सोशल मीडियावर 'अदिती'ची चर्चा; जाणून घ्या दोघांचं कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 16:32 IST

Open in App
1 / 11

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी टीम इंडियाकडून पदार्पण केलं. इशान किशननं मैदानावर येताच पहिल्या चेंडूवर खणखमीत षटकार लगावला. त्यानं ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५९ धावांची विक्रमी खेळी केली.

2 / 11

वाढदिवसाला वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला, पण ट्वेंटी-२० आणि वन डे पदार्पणातच अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. या उल्लेखनीय कामगिरीनंतर सोशल मीडियावर अदिती हुंडियाची चर्चा सुरू झाली.

3 / 11

अदिती हुंडिया ही फॅशन मॉडल आहे. ती २०१७च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेतील फायनलिस्ट होती. २०१८च्या मिस सुपर नॅशनल इंडियातही तिची निवड झाली होती.

4 / 11

१५ जानेवारी १९९७मध्ये तिचा जन्म राजस्थानची राजधानी जयपूर येथे झाला. इंडिया इंटरनॅशनल शाळेतून तिनं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जयपूरच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास पूर्ण केला.

5 / 11

अदितीला नेहमीच मॉडलिंगमध्ये करियर करायचे होते. तिनं मिस ब्यूटीफूल आईज आणि मिस बॉडी ब्यूटीफुल हे किताब जिंकले आहेत. २०१८मध्ये तिनं Miss Diva ही स्पर्धा जिंकली.

6 / 11

पोलंड येथे पार पडलेल्या मिस सुपरनॅशनल स्पर्धेत तिनं भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०१८मध्ये Miss Diva सुपरनॅशनल स्पर्धेच्या फायनलमध्ये मलायका अरोरानं विचारलेल्या प्रश्नावर तिनं दमदार उत्तर दिले होते.

7 / 11

२०१९च्या निवडणुकीत आमीर खान, महेंद्रसिंग धोनी, प्रियांका चोप्रा, रतन टाटा आणि बाबा रामदेव यांच्यापैकी कोणाला मत देशील, असा प्रश्न विचारला होता. त्यानवर तिनं रतन टाटा यांचे नाव सांगतले होते.

8 / 11

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशानने पदार्पणातील लढतीतच जोरदार धमाका करत आपल्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचे नाव अदिती हुंडिया हिच्याशी जोडले जात असून, अदितीसुद्धा सोशल मीडियावर नेहमीच इशान किशनचे कौतुक करताना दिसून येत आहे.

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :इशान किशनभारत विरुद्ध श्रीलंका