Join us  

Sara Tendulkar Spotted with Siddharth Kerkar : गोवापाठोपाठ लंडनमध्येही 'या' खास व्यक्तिसोबत दिसली सारा तेंडुलकर, इंस्टाग्रामवर शेअर केली स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:11 AM

Open in App
1 / 7

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते आणि तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चाही होते.

2 / 7

इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी ती गोव्यात सुट्टीसाठी गेली होती आणि तिच्या प्रत्येक फोटोला लाखो लाईक्स मिळाले होते.

3 / 7

गोव्यात सुट्टीवर असताना ती एका खास व्यक्तिसोबत दिसली होती आणि तिच व्यक्ती आता लंडनमध्येही सारासोबत दिसली आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्या व्यक्तिसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 7

सिद्धार्थ केरकर असे या व्यक्तीचे नाव आहे. १७ नोव्हेंबर २०२१मध्ये या व्यक्तिचं नाव चर्चेत आले होते. त्यावेळी साराने तिच्यासोबत इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला होता.

5 / 7

यात सारा जीपच्या फ्रंट सीटवरील दरवाज्यावर उभी असलेली दिसली होती आणि सिद्धार्थ सेल्फी घेत होता.

6 / 7

सारा सध्या लंडनमध्ये आहे आणि तिने शनिवारी इंस्टा स्टोरीवर मैत्रीण मार्टिना व सिद्धार्थ यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला.

7 / 7

सिद्धार्थ केरकर हा इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे जवळपास ८५ हजार फॉलोअर्स आहेत. तो एक आर्टिस्ट आहे आणि तो पेटिंग्स बनवतो.

टॅग्स :सारा तेंडुलकरइन्स्टाग्राम
Open in App