Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अशी' आहे स्टुअर्ट बिन्नी-मयंती लँगरची लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 13:42 IST

Open in App
1 / 5

भारतात क्रिकेटपटू कायमच चर्चेत असतात. क्रिकेटपटूंच्या खेळाइतकीच त्यांच्या अफेअर्सची, ब्रेक अप्सचीदेखील चर्चा होते. अनेकदा खेळाडूंमुळे त्यांच्या गर्लफ्रेंड, पत्नी चर्चेत येतात. मात्र स्टुअर्ट बिन्नी इतकीच चर्चा त्याची पत्नी मयंती लँगरचीदेखील होते. मयंतीनं क्रिकेटशी संबंधित अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे.

2 / 5

स्टुअर्ट बिन्नी हा भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा मुलगा आहे. स्टुअर्ट आणि मयंतीची भेट एका मुलाखतीवेळी झाली. त्यानंतर क्रिकेट आणि त्यासंबंधित कारणानं हे दोघे भेटत राहिले. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

3 / 5

खेळांमुळे माणसं जवळ येतात, असं म्हटलं जातं. स्टुअर्ट आणि मयंतीच्या बाबतीत नेमकं असंच काहीसं घडलं. क्रिकेटशी संबंधित गप्पांमुळे, क्रिकेटवर असलेल्या प्रेमामुळे दोघे जवळ आले आणि त्यांच्यातील नातं घट्ट झालं. यानंतर सप्टेंबर 2012 मध्ये विवाह बंधनात अडकले.

4 / 5

2012 मध्ये मयंतीनं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्याशी संबंधित अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं. याशिवाय फुटबॉलशी संबंधित अनेक कार्यक्रमांमध्येही ती सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत होती. मात्र यावेळी स्टुअर्ट बिन्नीच्या खेळात विशेष प्रगती नव्हती. मात्र लग्नानंतर स्टुअर्टचं नशीब बदललं. त्याच्या खेळात सुधारणा झाली. याचं संपूर्ण श्रेय स्टुअर्ट पत्नी मयंतीला देतो.

5 / 5

2012 मध्ये टी-20 वर्ल्ड कपसाठी दोघेजण श्रीलंकेला गेले होते. मात्र एकाच ठिकाणी असूनही दोघांना फार वेळ सोबत घालवता आला नाही. खेळाडूंच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ नये म्हणून प्रशिक्षकांनी स्टुअर्ट बिन्नीला कुटुंबापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तर मयंतीदेखील सूत्रसंचलनात व्यस्त होती. मात्र त्यावेळी दोघांनी अत्यंत प्रोफेशनल राहून आपल्या कामाला प्राधान्य दिलं. कामाचा, अतिव्यस्त वेळापत्रकाचा कोणताही परिणाम या दोघांनी त्यांच्या नात्यावर होऊ दिला नाही.

टॅग्स :क्रिकेटदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टमयंती लँगर