Join us  

"आदिपुरुष' पाहिल्यानंतर मला कळलं की...", सेहवागचं विधान अन् प्रभासचे चाहते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 3:02 PM

Open in App
1 / 10

आदिपुरूष चित्रपट सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सनॉन यांची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे.

2 / 10

अनेक नेटकऱ्यांनी भारतीय महाकाव्य रामायण हॉलिवूड चित्रपटांप्रमाणे दाखवले असल्याचे म्हणत चित्रपटाची खिल्ली उडवली. तर विविध संघटनांनी आदिपुरूषवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याआधीही अनेक चित्रपटांना विरोध झाला आहे.

3 / 10

पण, हिंदू-मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्माचे लोकही अभिनेता प्रभासच्या चित्रपटाची खिल्ली उडवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो.

4 / 10

सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या आदिपुरूष चित्रपटावरून सेहवागने एक ट्विट केले. सेहवागने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, 'आदिपुरुष'ला पाहिल्यानंतर मला कळले की कट्टप्पाने बाहुबलीला का मारले होते.'

5 / 10

या ट्विटवरून नेटकरी वीरूला जोरदार ट्रोल करत आहे. सेहवागला प्रभासचे चाहते ट्रोल करत असून भारतीय खेळाडूची खिल्ली उडवत आहेत.

6 / 10

एका युजरने लिहिले, 'मित्रा, आठवडाभरानंतरही जोक कॉपी केलास.' तसेच सेहवागचा एक जुना फोटो शेअर करत एकाने म्हटले, 'तुला पाहिल्यानंतर मला समजले की लोक धर्माचा तिरस्कार का करू लागतात.'

7 / 10

वीरेंद्र सेहवागने आदिपुरुषबद्दल केलेल्या विधानामुळे बाहुबली फेम प्रभासचे चाहते प्रचंड संतापले आहेत आणि अनेकजण सेहवागबद्दल अपमानास्पद भाषा वापरत आहेत.

8 / 10

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आणि पहिल्या तीन दिवसात जगभरात ३०० कोटी रुपयांची कमाई केली, परंतु तेव्हापासून चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घसरण होत आहे.

9 / 10

बाहुबली फेम प्रभास, अभिनेत्री क्रिती सनॉन आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरूषने चाहत्यांना भुरळ घातली. पण विविध राजकीय पक्षांचा विरोध यामुळेच चित्रपट जास्त चर्चेत राहिला.

10 / 10

आदिपुरूषने शुक्रवारी २३ जून रोजी प्रदर्शित झाल्याच्या आठव्या दिवशी सर्व भाषांमध्ये केवळ ३.४० कोटी रुपयांची कमाई केली.

टॅग्स :विरेंद्र सेहवागआदिपुरूषट्रोलभारतीय क्रिकेट संघप्रभास
Open in App