मैदानावर दमदार फटेकाबाजी करणारा एबी डिव्हिलियर्स प्रेमाच्या बाबतीत मात्र लाजाळू आहे, हे सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही. पण, त्याची ही लव्ह स्टोरी पत्नी डॅनिएल हिनं सांगितली. २०१६मध्ये एबीनं त्याच्या आत्मचरित्राचं प्रकाशन केलं आणि त्यातही त्यानं ही लव्ह स्टोरी नमूद केली आहे.
३७ वर्षीय एबीची पत्नी डॅनिएल हिनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रश्नोत्तराचा क्लास भरवला होता आणि त्यात तिला वैयक्तिक आयुष्यावरही प्रश्न विचारले गेले. तिनंही मनमोकळेपणे त्यांची उत्तरं दिली.
एका नेटिझन्सनं एबी आणि तिची पहिली भेट कुठे झाली, व कोणी कोणाला प्रपोज केलं, असा सवाल केला. त्यावर डॅनिएल म्हणाली. आग्रा येथील ताजमहाल समोर एबीनं तिला प्रपोज केलं. वॉटरबर्ग माऊंटन येथील एका कार्यक्रमात एबी व डॅनिएल यांची पहिली भेट झाली. त्यावेळी एबीची आईही सोबत होती.
लंच एकत्र केल्यानंतर त्या लॉजचे मालक जॉन स्वार्ट यांनी त्यांच्या मुलीची म्हणजेच डॅनिएलची एबीशी ओळख करून दिली. डॅनिएलचे डोळे पाहूनच एबी प्रेमात पडला होता. तिच्याशी बोलता यावं याकरिता त्यानं आईला तिचा नंबर घेण्यास सांगितले. त्यानंतर दोघं एकमेकांना मॅसेज करू लागले.
पण, पहिली काही वर्ष डॅनिएल तिच्या शिक्षणात व्यग्र असल्यानं दोघांचं नातं फार पुढे जाऊ शकलं नव्हतं. एबीच्या भाव्चाय लग्नात ही दोघं पुन्हा भेटली आणि त्यानंतर प्रेमकहाणी सुरू झाली. २०१२मध्ये आयपीएलदरम्यान एबीनं तिला आग्रा येथील लाजमहाल येथे नेले व गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घातली.
ताजमहाल प्रेमाचं प्रतीक असल्यानं याच ठिकाणी डॅनिएलला प्रपोज करायचं, हे डी'व्हिलियर्सनं आधीच ठरवलं होतं. आयपीएलच्या निमित्तानं डी'व्हिलियर्स अनेकदा भारतात आला होता. त्यामुळे ताजमहालच्या समोर डॅनिएलला मागणी घालायची, असा विचार त्याच्या मनात बराच काळापासून होता.