Join us

9 साल बाद ! शोएबसोबतच्या पहिल्या भेटीचं रहस्य उलगडलं अन् सानियाचा 'समज' दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 16:43 IST

Open in App
1 / 7

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांची प्रेमकथा ही एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखीच आहे. सानिया ही भारताची टेनिस स्टार, तर शोएब पाकिस्तान क्रिकेट संघातील प्रमुख फलंदाज...

2 / 7

भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशांमधील संबंध पाहता सानिया व शोएब यांच्या लग्नाला झालेला विरोध. तरीही या प्रेमीयुगुलांनी 2010मध्ये केलेला विवाह आणि गेल्या वर्षी या दोघांना झालेली पुत्ररत्न प्राप्ती.

3 / 7

पण, सानिया व शोएब यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात कधी व कोठे झाली हे आतापर्यंत कोणालाच माहित नव्हतं. तो प्रसंग सानियानं सांगितला.

4 / 7

त्यांच्या लग्न करण्याच्या निर्णयावर मिश्र प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी तर सानियाच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केलं. पण, ते आता इतिहासजमा झाले आहे. दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे.

5 / 7

India Today ला दिलेल्या मुलाखतीत सानियानं शोएबसोबतच्या पहिल्या भेटीचा प्रसंग सांगितला. सानियाला आतापर्यंत तिचं आणि शोएबचं लग्न हा योगच असल्याचं वाटतं होतं. पण, तो योगायोग नव्हता.

6 / 7

सानियानं सांगितलं,''तो एक क्रिकेटपटू अन् मी टेनिसपटू, एवढंच काहीते आम्ही एकमेकांना ओळखत होतो. पण, आमची पहिली भेट होबार्टच्या एका रेस्टॉरंटमध्ये झाली. सायंकाळचे 6 वाजले असतील आणि त्यावेळी आम्हा दोघांशिवाय तेथे चिटपाखरूही नव्हतं.''

7 / 7

''आमची ती भेट ही नियतीनंच ठरवली होती, असं मला वाटत होतं. पण, नंतर मला समजलं की मी तेथे होते म्हणून शोएब ठरवून मला भेटण्यासाठी आला होता. मी आतापर्यंत नियतिचे आभार मानत होते,'' असं तिनं सांगितलं.

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकटेनिस