Join us  

६ डिसेंबर! रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्यासह ७ क्रिकेटपटूंचा एकाच दिवशी हॅप्पी बर्थडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 12:20 PM

Open in App
1 / 7

जसप्रीत बुमराह - भारताच्या स्टार गोलंदाजाचा जन्म ६ डिसेंबर १९९३ सालचा... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीने दबदबा निर्माण केला आहे. सातत्याने यॉर्कर मारण्याचे त्याचे कौशल्य प्रतिस्पर्धींना अचंबित करणारे आहे आणि भारतीय संघातील तो महत्त्वाचा खेळाडू आहे.

2 / 7

रवींद्र जडेजा - अष्टपैलू रवींद्र जडेजा याला आपण सर जडेजा, रॉकस्टार आदी नावाने ओळखतो.. १९८८मध्ये जडेजाचा आजच्याच तारखेला जन्म झाला. डावखुरा फलंदाज आणि फिरकीपटू असलेला जडेजाचा चपळ क्षेत्ररक्षणाच्या बाबतित कुणी हात पकडू शकत नाही.

3 / 7

श्रेयस अय्यर - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताची मधली फळी सक्षम करणाऱ्या मुंबईच्या या खेळाडूचा जन्म १९९४ सालचा... आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व सांभाळले होते आणि सध्या तो कोलकाता नाइट रायडर्सचा सदस्य आहे.

4 / 7

ग्लेन फिलिप्स - न्यूझीलंडच्या या आक्रमक फलंदाजाचा जन्म १९९६ मध्ये झाला. किवींच्या आघाडीच्या फळीत आक्रमक सुरुवात करणाऱ्या फिलप्सने अनेक सामने एकहाती फिरवले आहेत.

5 / 7

करुण नायर - १९९१ मध्ये जन्मलेल्या करुण नारयने १९ वर्षांखालील संघापासून ते कसोटी पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि ७६ साम्यांत १४९६ धावा केल्या आहेत.

6 / 7

आर पी सिंग - १९८५ च्या आरपी सिंगने त्याच्या डाव खुऱ्या जलद माऱ्याने भारतीय क्रिकेटमधील एक काळ गाजवला. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या संघाचा तो सदस्य होता.

7 / 7

अँड्य्रू फ्लिंटॉफ - इंग्लंडचा माजी खेळाडू फ्लिंटॉपचा जन्म १९७७ चा... इंग्लंडच्या २००५ च्या ऐतिहासिक अॅशेस विजयात फ्लिंटॉफचा सिंहाचा वाटा होता.

टॅग्स :जसप्रित बुमराहश्रेयस अय्यररवींद्र जडेजा