RCB नं केली MI ची बरोबरी, पण... यंदा टॉपरसह सर्वाधिक वेळा प्लेऑफ्स खेळणारे ३ संघ ठरले फेल

एक नजर आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक वेळा प्लेऑफ्ससाठी पात्र ठरलेल्या IPL फ्रँचायझी संघांवर...

यंदाच्या हंगामातील प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारताच RCB नं सर्वाधिक वेळा प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारणाऱ्या संघांच्या यादीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केलीये.

आयपीएलच्या १८ व्या हंगामातील प्लेऑफ्समधील ३ संघ ठरले आहेत. गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्जला प्लेऑफ्सचे तिकीट मिळाले आहे.

मुंबई इंडियन्सला पुन्हा त्यांच्या एक पाऊल राहण्याची संधी आहे. चौथ्या संघाच्या रुपात ते प्लेऑफ्ससाठी क्वालिफाय करू शकतात. इथं एक नजर टाकुयात आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक वेळा प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारणाऱ्या आघाडीच्या पाच IPL फ्रँचायझी संघांवर...

आयपीएलमध्ये सर्वाधिक प्लेऑफ्स खेळण्याचा विक्रम हा चेन्नई सुपर किंग्जच्या नावे आहे. दोन वर्षांच्या बंदीच्या कारवाईनंतरही ते १२ वेळा प्लेऑफ्समध्ये खेळले आहेत. पण टॉपरवर यावेळी फेल होण्याची नामुष्की ओढावली.

चेन्नई सुपर किंग्ज पाठोपाठ सर्वाधिक पाच वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा नंबर लागतो. MI नं आतापर्यंत १० वेळा प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारली आहे. उर्वरित दोन सामने जिंकून अकराव्या वेळी ते प्लेऑफ्स खेळण्यासाठी उत्सुक असतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दहाव्यांदा प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारली आहे. आतापर्यंत त्यांनी एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे ८ वेळा प्लेऑफ्स खेळणाऱ्या केकेआरनं तीन वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ८ वेळा प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारली असून गत हंगामात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.