कॅमेरून ग्रीन - मुंबई इंडियन्सकडून १७.५ कोटींमध्ये ट्रेड करून बंगळुरूने कॅमेरून ग्रीनला आपलेसे केले. पण, त्याने पाच सामन्यांत १७ च्या सरासरीने केवळ ६८ धावा केल्या आहेत व फक्त २ विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईकडून ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने दमदार कामगिरी केली होती, परंतु त्याची पुनरावृत्ती तो RCB साठी करू शकलेला नाही.
यश दयाल - संघातील गोलंदाजी मजबूत करण्यासाठी यश दयालला RCB च्या ताफ्यात घेतले, परंतु त्याने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याला सहा सामन्यांत पाच विकेट्स घेता आल्या आहेत आणि त्याने ९.०९च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.
कर्ण शर्मा - आयपीएल २०२४ मध्ये शर्मा आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवरील पुढील सामन्यात RCB त्याला संधी देण्याची शक्यताही कमीच आहे. त्याच्याजागी बंगळुरूचा संघ युझवेंद्र चहलची जागा भरून काढेल असा फिरकीपटू शोधतील.
रजत पाटीदार -परदेशी खेळाडूंवर विसंबून राहण्यापेक्षा RCB ला मधल्या फळीत भारतीय फलंदाज हवा आहे, ज्यावर ते भरवसा ठेवू शकतील. रजत पाटीदारने यंदाच्या पर्वात हा भरवसा तोडला आहे. त्याने ७ सामन्यांत फक्त १०९ धावा केल्या आहेत.
विल जॅक्स - मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीतून विल जॅक्सने आयपीएलमध्ये पदार्पण केले, परंतु त्याला ६ चेंडूंत ८ धावा करता आल्या. त्यानंतर त्याला संघातून वगळले गेले. त्याच्यासाठी बंगळुरूने ३.२० कोटी मोजले आहेत