राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा कोच कोण? गौतम गंभीर, आशिष नेहरासह ३ परदेशी नावं चर्चेत

Who Can Replace Rahul Dravid As India's Head Coach? सीनियर संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड याला अपयश आलेले पाहायला मिळतेय...

सीनियर संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड याला अपयश आलेले पाहायला मिळतेय... मागील आठवड्यात भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. त्याआधी मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत हरला. सलग दोन आयसीसी स्पर्धांमधील अपयशानंतर राहुल द्रविडच्या बदलाची चर्चा सुरू झालीय. २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर द्रविडकडून ही जबाबदारी काढून घेतली जाण्याची शक्यता आहे.

राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक कोण? याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे आणि आशिष नेहरा व गौतम गंभीर यांच्यासह तीन परदेशी अशी पाच नावं चर्चेत आली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला अन् राहुल द्रविडकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

आशिष नेहरा - आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याच्याकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नेहराने आयपीएलमध्ये त्याच्या मार्गदर्शनाची छाप पाडली अन् GT ने पहिल्याच वर्षी जेतेपद पटकावले, तर यंदा त्यांनी अंतिम फेरीत पुन्हा धडक मारली. आयपीएल ट्रॉफी उंचावणारा तो पहिला भारतीय प्रशिक्षक आहे.

जस्टीन लँगर - ऑस्ट्रेलियन दिग्गज जस्टीन लँगरच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने २०२१चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०२१-२२ची अॅशेस मालिका जिंकली. तोही भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असू शकतो.

स्टीफन फ्लेमिंग - न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज स्टीफन फ्लेमिंग आयपीएलमध्ये MS Dhoni च्या चेन्नई सुपर किंग्सला मार्गदर्शन कररतो. पाच आयपीएल जेतेपदं नावावर असलेला तो पहिला मुख्य प्रशिक्षक आहे. त्याचे हेच यश भारतीय संघासाठी कामी आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

गौतम गंभीर - भारताचा यशस्वी सलामीवीर आणि दिग्गज फलंदाज गौतम गंभीर आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाला मार्गदर्शन करतोय. त्याच्याकडे मुख्य प्रशिक्षकाचा अनुभव नसला तरी त्याच्याकडे गेम अव्हेरनेस चांगला आहे आणि भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी तो सक्षम उमेदवार ठरू शकतो

रिकी पाँटिंग - आयसीसीचे सर्वाधिक जेतेपदं नावावर असलेला कर्णधार रिकी पाँटिंगही भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत दिसला तर आश्चर्य वाटायला नको. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने २०१५मध्ये जेतेपद पटकावले, तर दिल्ली कॅपिटल्सने ( २०२०) पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला.