सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक मानले जाणारे डॉन ब्रॅडमन यांनी केवळ ५२ कसोटी सामन्यांमध्ये ९९.९४ च्या अविश्वसनीय सरासरीने ६,९९६ धावा केल्या. क्रिकेट इतिहासातील ही सर्वोत्तम सरासरी आहे. मात्र, इतके विक्रम नावावर असतानाही, त्यांच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत त्यांना केवळ सहा षटकार मारता आले.
इंग्लंडचे माजी फलंदाज माइक आथर्टन यांनी ११५ कसोटी सामन्यांमध्ये १६ शतके आणि ४६ अर्धशतकांसह ७,७२८ धावा केल्या. परंतु, त्यांनी त्यांच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत फक्त चार षटकार मारले.
श्रीलंकेचे माजी क्रिकेट दिग्गज मार्वन अटापट्टू यांनी ९० कसोटी सामन्यांमध्ये ५,५०२ धावा केल्या. त्यांची फलंदाजी तंत्रशुद्ध मानली जाते, पण त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केवळ चार षटकार लगावले.
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डेव्हिड बून यांनी १०७ कसोटी सामन्यांमध्ये ४३.६५ च्या सरासरीने ७,४२२ धावा केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बून यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत फक्त दोन षटकार मारले.
भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी १३४ कसोटी सामन्यांमध्ये ४५.९७ च्या सरासरीने ८,७८१ धावा केल्या. लक्ष्मणने त्यांच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत केवळ पाच षटकार मारले.