Join us

IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 19:13 IST

Open in App
1 / 5

रोमारियो शेफर्ड: आरसीबीचा फलंदाज रोमारियो शेफर्डने सीएसकेविरुद्ध सामन्यात १४ चेंडूत ५३ धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि सहा षटकारांचा समावेश आहे. या कामगिरीसह तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा कॅरिबियन खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे. त्याने आयपीएल २०२३ मध्ये १३ चेंडूत अर्धशतक ठोकले.

2 / 5

सुनील नारायण: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या कॅरेबियन खेळाडूंच्या यादीत कोलकाता नाईट राडयर्सचा सलामीवीर सुनील नारायण दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आयपीएल २०१७ मध्ये आरसीबीविरुद्ध १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

3 / 5

निकोलस पूरन: धडाकेबाज कॅरिबियन फलंदाज निकोलस पूरननेही १५ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला. त्याने आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीविरुद्ध अशी कामगिरी केली. पूरन सध्या लखनौ सुपर जायंट्सचा भाग आहे.

4 / 5

कायरन पोलार्ड: वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने आयपीएलमध्ये १७ चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सकडून खेळताना ही कामगिरी केली. पोलार्ड आता मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक आहे.

5 / 5

ख्रिस गेल: वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल या यादीत पाचव्या स्थानावर आहे. २०१३ च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याने १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. गेल तेव्हा आरसीबीचा भाग होता. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या गेलने आता निवृत्ती घेतली आहे.

टॅग्स :आयपीएल २०२४इंडियन प्रिमियर लीग २०२५