विश्वचषकाच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताविरूद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. मायदेशात झालेल्या मालिकेत भारताने २-१ ने विजय मिळवला. भारताविरूद्धच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने ३ सामन्यांत केवळ ३ धावा केल्या होत्या. आफ्रिकेच्या कर्णधाराचा खराब फॉर्म पाहता ३२ वर्षीय बावुमा संघातून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तानी संघाचा खेळाडू हैदर अलीने आतापर्यंत कोणतीच मोठी खेळी केली नाही. त्याने आतापर्यंत ३३ टी-२० सामन्यांमध्ये १२६.३२च्या स्ट्राईक रेटने ४९९ धावा केल्या आहेत. हैदर अली टी-२० विश्वचषकामध्ये देखील अपयशी ठरला आहे. या विश्वचषकानंतर हैदर अलीला संघातून वगळण्यात येईल, असेही पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी म्हटले आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंच चालू विश्वचषकानंतर टी-२० क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो. ३५ वर्षीय आरोन फिंच मागील काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. अलीकडेच श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात कर्णधार फिंच धावा काढताना खूप संघर्ष करताना दिसला.
भारतीय संघाचा नवीन फिनिशर दिनेश कार्तिक सध्या भारतीय संघाचा हिस्सा आहे. तो यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडत आहे. मात्र दिनेश कार्तिकचे वय पाहता या विश्वचषकानंतर तो निवृत्त होण्याची दाट शक्यता आहे. ऋषभ पंत, संजू सॅमसन, ईशान किशन यांना पुढील विश्वचषकासाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून तयार करण्यासाठी भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
न्यूझीलंडच्या संघातून मार्टिन गुप्टील जवळपास बाहेर पडला आहे. आतापर्यंत मार्टिन गुप्टिलला २०२२ च्या टी२० विश्वचषकातील प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. किवी संघ फिन ॲलेनला प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून खेळवत आहे. या विश्वचषकानंतर मार्टिन गुप्टिलला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणे जवळपास निश्चित आहे.