इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी जयपूर येथे झाला. 70 जागांसाठी 346 हून अधिक खेळाडू रिंगणात होते. त्यात सर्वाधिक भाव खाल्ला तो वरुण चक्रवर्ती, जयदेव उनाडकट यांनी. पण आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागड्या खेळाडूचा मान अजूनही युवराज सिंगच्या नावावर आहे. 2015 मध्ये त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स ( सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाने 16 कोटींत घेतले होते. जाणून घेवूया आयपीएलमधील दहा महागडे खेळाडू.
युवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स 16 कोटी ( 2015)
बेन स्टोक्स - पुणे सनरायजर्स 14.5 कोटी ( 2017)
युवराज सिंग - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 कोटी ( 2014)
बेन स्टोक्स - राजस्थान रॉयल्स 12.5 कोटी ( 2018)
दिनेश कार्तिक - दिल्ली डेअरडेव्हिल्स 12.5 कोटी ( 2014)
जयदेव उनाडकट - राजस्थान रॉयल्स 11.5 कोटी ( 2018)
गौतम गंभीर - कोलकाता नाईट रायडर्स 11.4 कोटी ( 2011)
लोकेश राहुल - किंग्ज इलेव्हन पंजाब 11 कोटी ( 2018)
दिनेश कार्तिक - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10.5 कोटी ( 2015)
रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्ज 9.72 कोटी ( 2012)