शाहिद आफ्रिदीनं गरळ ओकली; भारत-पाक मालिकेवरून पंतप्रधान मोदींवर 'बोचरी' टीका

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं भारत-पाकिस्तानचा प्रस्ताव ठेवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 02:28 PM2020-04-13T14:28:42+5:302020-04-13T14:29:38+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan wants to play against India, but it’s difficult because of the Modi Government, Shahid Afridi svg | शाहिद आफ्रिदीनं गरळ ओकली; भारत-पाक मालिकेवरून पंतप्रधान मोदींवर 'बोचरी' टीका

शाहिद आफ्रिदीनं गरळ ओकली; भारत-पाक मालिकेवरून पंतप्रधान मोदींवर 'बोचरी' टीका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा करता यावा, याकरिता भारत-पाकिस्तान यांच्यात तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी ठेवण्यात आला होता. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं तो ठेवला होता. त्यावरून त्याच्यावर टीका झाली. भारताचे माजी कर्णधार कपिल देव, आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अख्तरवर टीका केली. पण, रावळपिंडी एक्स्प्रेच्या मदतीला पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी पुढे आला आहे. त्यानं भारत-पाक मालिकेवरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली.

'रामायणा'तील योद्ध्याकडून शिकलो फलंदाजी; वीरेंद्र सेहवागनं उलगडलं रहस्य

प्रत्येक क्रिकेट चाहत्याला भारत-पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना पाहण्याची उत्सुकता असते. सध्या उभय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) आणि आशिया चषक स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध खेळतात. दोन्ही देशांमध्ये  2012 सालानंतर द्विदेशीय मालिका झालेली नाही. कोरोना व्हायरसच्या संकटात दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवून निधी गोळा करण्याचा प्रस्ताव अख्तरनं ठेवला होता. या मालिकेतून उभ्या राहणाऱ्या निधीचे दोन्ही देशांत समसमान वाटप करण्याचा प्रस्तावही अख्तरनं ठेवला होता.

आफ्रिदीनं यावेळी भारतीय सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. पाकिस्तानला नेहमी भारताविरुद्ध क्रिकेट खेळायचे आहे, परंतु सध्या मोदी सरकारमध्ये प्रचंड नकारत्मकता आहे आणि त्यामुळे द्विदेशीय मालिका होणे अवघड आहे. पाकिस्तान सकारात्मक दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकत आहे आणि भारताकडूनही तिच अपेक्षा आहे, असे आफ्रिदीनं सांगितलं. PakPassionशी बोलताना तो म्हणाला,''भारताविरुद्ध आम्हाला खेळायचे आहे, परंतु मोदी सरकार असल्यानं प्रचंड नकारात्मकता त्यांच्याकडून येत आहे. त्यामुळे ते शक्य नाही.''  

क्रिकेटनं या दोन्ही देशांना नेहमी एकत्र आणलं असल्याचंही त्यानं सांगितलं. त्यामुळे त्यानं शोएब अख्तरच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तो म्हणाला,''क्रिकेटनं नेहमी दोन्ही देशांना एकत्र आणलं आहे आणि त्याप्रमाणे दोन्ही देशांचं नातं घट्ट व्हायला हवं. शोएब अख्तरच्या मताशी मी सहमत आहे. भारत-पाकिस्तान मालिका व्हायला हवी, परंतु कधी व कोठे हा प्रश्न आहे.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

अरे देवा... ती ५२ अन् तो २२ वर्षांचा; सुपरस्टार फुटबॉलपटूची आई प्रेमात!

लॉकडाऊनच्या काळात विकृतीचा कळस; गायीवर बलात्कार केल्याचा फुटबॉलपटूचा दावा

शोएब अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूला पडतंय भारत-पाक मालिकेचे स्वप्न

क्रिकेटला ब्रेक तरीही विराट कोहली टॉप; आयसीसीनं पोस्ट केली मजेशीर आकडेवारी

'अपेक्षा वि. वास्तव'; सानिया मिर्झाकडून पती शोएब मलिकाला लग्नाच्या हटके शुभेच्छा

...तर MS Dhoniची कोणत्या आधारावर टीम इंडियात निवड कराल?; गौतमचा 'गंभीर' सवाल

Web Title: Pakistan wants to play against India, but it’s difficult because of the Modi Government, Shahid Afridi svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.