भारताला आता हाच संघ पराभूत करू शकतो, खेळाडू पाहाल तर हैराण व्हाल

आता मायदेशात सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 05:45 PM2019-10-21T17:45:02+5:302019-10-21T17:45:26+5:30

whatsapp join usJoin us
The only team that can beat India now, will be surprised if you look at the players | भारताला आता हाच संघ पराभूत करू शकतो, खेळाडू पाहाल तर हैराण व्हाल

भारताला आता हाच संघ पराभूत करू शकतो, खेळाडू पाहाल तर हैराण व्हाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. कारण भारताने आपल्या मातीमध्ये आतापर्यंत अकरा कसोटी मालिका जिंकलेल्या आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कारण आतापर्यंत आपल्याच मैदानात सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, त्यांनी सलग दहा मालिका जिंकल्या होत्या. त्यामुळे आता मायदेशात सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर आहे.

भारताला त्यांच्याच मातीत पराभूत करणे, हे सर्वात कठिण समजले जात आहे. प्रत्येक संघाने भारतामध्ये विजय मिळवण्यासाठी जीवाचे रान केले, पण गेल्या अकरा कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाने विजयच मिळवले आहेत.

भारताला जर त्यांच्याच मातीत पराभूत करायचे असेल तर संघ कसा असावा, यावर आज चर्चा झाली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्याच्या उपहारावेळी ही चर्चा झाली. त्यावेळी माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी एक संघ बनवला आहे. हा संघच आता भारताला पराभूत करू शकतो, असे म्हटले जात आहे. या संघात नेमके कोणते खेळाडू आहेत, ते जाणून घ्या...

रिषभ पंतला मिळाली तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी
भारतीय संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आहे. त्यामुळे रिषभ पंत तिसऱ्या सामन्यात कसे काय खेळू शकतो, हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण तिसऱ्या सामन्यात मात्र पंत हा यष्टीरक्षण करत असल्याचे पाहायला मिळाले.

तिसऱ्या सामन्याच्या अखेरच्या सत्रामध्ये साहा हा यष्टीरक्षण करताना दिसला नाही. कारण साहाला 27 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. आर. अश्विनचा एक चेंडू थोडा खाली राहीला. हा चेंडू पकडण्यासाठी साहा वाकला आणि त्याला दुखापत झाली. त्यामुळे साहाला मैदान सोडावे लागले. त्यामुळे साहाच्या जागी पंत यष्टीरक्षणासाठी मैदानात उतरला होता.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीतही पाहुण्यांनी शरणागती पत्करली. भारताच्या पहिल्या डावातील 9 बाद 497 ( डाव घोषित) धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 162 धावांत गडगडला. उमेश यादव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शाहबाज नदीम यांनी उत्तम गोलंदाजी केली. एकवेळी आफ्रिकेचा डाव 3 बाद 107 असा मजबूत स्थितीत दिसत होता, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना जबरदस्त धक्के दिले. भारताने पहिल्या डावात 335 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीनं फॉलोऑन देऊन ऐतिहासिक कामगिरी केली. 

सऱ्या दिवशी रोहित शर्मानं द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक झळकावले. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच द्विशतक ठरले, तर अजिंक्यचे 11वे शतक ठरले. या दोघांनी 267 धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला मजबूत स्थितित आणले. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह मजबूत स्थितित आणले. त्यानंतर रवींद्र जडेजानं अर्धशतकी खेळी केली. भारतानं पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात आफ्रिकेचे दोन फलंदाज अवघ्या 9 धावांत माघारी परतले होते.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात उमेश यादवनं अप्रतीम चेंडू टाकून आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचा त्रिफळा उडवला. त्यानंतर झुबायर हम्झा आणि टेंबा बवुमा यांनी चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवेल असे वाटले होते. पण, रवींद्र जडेजानं अर्धशतक झळकावणाऱ्या हम्झाला बाद केले. हम्झानं 79 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकार खेचून 62 धावा केल्या. पंधरा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर प्रथमच टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या शाहबाज नदीमनं भारताला यश मिळवून दिले. त्यानं बवूमाला बाद करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट पटकावली. बवूमानं 72 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीनं 32 धावा केल्या होत्या. कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या हेन्रीक क्लासेनला रवींद्र जडेजानं त्रिफळाचीत केले. 

Web Title: The only team that can beat India now, will be surprised if you look at the players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.