NZ vs BAN, Ten Over Match : विराट कोहली खूश झाला, RCBच्या नव्या भीडूनं २४४च्या स्ट्राईक रेटनं केली ७१ धावांची वादळी खेळी 

New Zealand vs Bangladesh , Ten Over Match : न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्या पावसाचा व्यत्यय आला आणि १०-१० षटकांचा सामन्यांना निर्णय झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 02:38 PM2021-04-01T14:38:12+5:302021-04-01T14:39:51+5:30

whatsapp join usJoin us
NZ vs BAN, Ten Over Match : Madness from Finn Allen, 71 runs from just 29 balls including 10 fours and 3 sixes, New Zealand 141/4 | NZ vs BAN, Ten Over Match : विराट कोहली खूश झाला, RCBच्या नव्या भीडूनं २४४च्या स्ट्राईक रेटनं केली ७१ धावांची वादळी खेळी 

NZ vs BAN, Ten Over Match : विराट कोहली खूश झाला, RCBच्या नव्या भीडूनं २४४च्या स्ट्राईक रेटनं केली ७१ धावांची वादळी खेळी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

New Zealand vs Bangladesh , Ten Over Match : न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्या पावसाचा व्यत्यय आला आणि १०-१० षटकांचा सामन्यांना निर्णय झाला. बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गुप्तील ( Martin Guptill ) व फिन अ‍ॅलन ( Finn Allen ) यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५.४ षटकांत ८५ धावांची भागीदारी केली. गुप्तील १९ चेंडूंत १ चौकार व ५ षटकार खेचून ४४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अॅलननं वादळी खेळी केली. IPL 2021त न खेळताही श्रेयस अय्यर कमावणार ७ कोटी, जाणून घ्या काय आहे Players Insurance scheme!

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाच्या ताफ्यात नव्यानं दाखल होणाऱ्या अ‍ॅलनच्या या वादळी खेळीनं विराट कोहली नक्की खूश झाला असेल. गुप्तील बाद झाल्यानंतर आलेल्या ग्लेन फिलिप्सनं ६ चेंडूंत २ षटकारांसह १४ धावा केल्या. अ‍ॅलन यानं २९ चेंडूंत २४४.८३च्या स्ट्राईक रेटनं १० चौकार व ३ षटकारांसह ७१ धावांची वादळी खेळी केली. न्यूझीलंडननं दहा षटकांत ४ बाद १४१ धावा चोपल्या. 

18 चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण ( Fastest T20I fifties for New Zealand (by balls)
कॉलीन मुन्रो - १४ चेंडू वि. श्रीलंका, २०१६
फिन एलन - १८ चेंडू वि. बांगलादेश, २०२१
कॉलीन मुन्रो - १८ चेंडू वि. वेस्ट इंडिज, २०१८
कॉलीन मुन्रो - १८ चेंडू वि. इंग्लंड, २०१८  




कोण आहे फिन अ‍ॅलन ?
ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश फिलिप ( Josh Philippe) यान इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्याला रिप्लेसमेंट म्हणून RCBन न्यूझीलंडचा उद्योन्मुख खेळाडू फिन अ‍ॅलन ( Finn Allen) याला करारबद्ध केलं आहे. एलनला आयपीएल लिलावात कुणीच खरेदी केले नाही. २० लाख ही त्याची बेस प्राईज होती. २१ वर्षीय अ‍ॅलननं न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश लीगमध्ये ५१२ धावा चोपल्या आहेत आणि त्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यानं ५६ चौकार व २५ षटकार खेचले आहेत.  IPL 2021 : बायो बबलला आणखी एक खेळाडू वैतागला, यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या CSK ला फटका बसला    

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, फिन अ‍ॅलन

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction) - ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) १४.२५ कोटी, सचिन बेबी ( Sachin Baby) २० लाख, रजत पाटीदार ( Rajat Patidar) २० लाख, मोहम्मद अझरुद्दीन ( Mohammed Azharrudeen) २० लाख, कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) १५ कोटी, डॅनिएल ख्रिस्टियन ( Daniel Christian) ४.८ कोटी, के एस भारत (KS Bharat) २० लाख, सूयश प्रभुदेसाई ( Suyash Prabhudesai) २० लाख
 

Web Title: NZ vs BAN, Ten Over Match : Madness from Finn Allen, 71 runs from just 29 balls including 10 fours and 3 sixes, New Zealand 141/4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.