ZIM vs AFG Test : कसोटीत झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय; १२ वर्षांनी घरच्या मैदानात मारली बाजी

१२ वर्षांनी घरच्या मैदानात मारली बाजी, तिसऱ्यांदा साधला हा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 21:54 IST2025-10-22T21:52:07+5:302025-10-22T21:54:46+5:30

whatsapp join usJoin us
Zimbabwe To First Home Test Win In 12 Years Beat Afghanistan By Innings And 73 Runs Biggest Test Win Aafter 24 Years | ZIM vs AFG Test : कसोटीत झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय; १२ वर्षांनी घरच्या मैदानात मारली बाजी

ZIM vs AFG Test : कसोटीत झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय; १२ वर्षांनी घरच्या मैदानात मारली बाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Zimbabwe To First Home Test Win After 12 Years Beat Afghanistan : झिम्बाब्वेच्या संघाने हरारेच्या स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर रंगलेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा एक डाव आणि ७३ धावांनी पराभव करत १२ वर्षांनी घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. कसोटीत २४ वर्षांनी झिम्बाब्वेच्या संघानं धावांच्या फरकाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. याशिवाय अनेक विक्रम झिम्बाब्वेच्या संघाने आपल्या नावे केले आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

१२ वर्षांनी घरच्या मैदानात मारली बाजी, तिसऱ्यांदा साधला हा डाव

झिम्बाब्वेच्या संघाने कसोटीत मिळवलेला हा १५ वा विजय ठरला. एवढेच नाही तर तिसऱ्यांदा झिम्बाब्वेच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला धावांसह डावांनी पराभूत करण्याचा डाव साधला आहे. याआधी १९९५ मध्ये झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला एक डाव आणि ६४ धावांनी पराभूत केले होते. याशिवाय २००१ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने एक डाव आणि ३२ धावांनी विजय नोंदवला होता. एवढेच नाही तर २०१३ नंतर झिम्बाब्वेच्या संघाने कसोटी मिळवलेला हा पहिला विजय ठरला.  

Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

ब्रॅड एव्हान्सचा 'पंजा' अन् बेन करनची शतकी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेला मिळाली मोठी आघाडी

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानच्या संघ पहिल्या डावात ३२.३ षटकात १२७ धावांवर आटोपला. झिम्बाब्वेच्या संघाकडून ब्रॅड एव्हान्स याने ९.३ षटकात फक्त २२ धावा खर्च करत अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत धाडला. त्यानंतर झिम्बाब्वेकडून बेन करन याने १२१ धावांची खेळी केली. याशिवाय सिकंदर रझा याने ८८ चेंडूत ६५ धावा केल्या तर निक वेल्च याने ४९ धावांची उपयुक्त खेळी करत झिम्बाब्वेच्या संघाने ३५९ धावा करत पहिल्या डावात २३२ धावांची आघाडी घेतली होती. अफगाणिस्तानच्या ताफ्यातून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या झियाउर रहमान याने ९७ धावा खर्च करत ७ विकेट्स घेत खास विक्रमाला गवसणी घातली. पण त्याची ही कामगिरी शेवटी व्यर्थ ठरली.

दुसऱ्या डावात झिम्बाब्वेच्या संघाकडून नगारवाचा जलवा

दुसऱ्या डावात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकली. परिणामी ४३ षटकात अफगाणिस्तानचा दुसरा डाव १५९ धावांवर आटोपला. झिम्बाब्वेकडून रिचर्ड नगारवा याने १३ षटकात ३७ धावा खर्च करत पाच विकेट्सचा डाव साधला. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झादरान याने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. 

Web Title : टेस्ट में जिम्बाब्वे ने अफ़ग़ानिस्तान को हराया, ऐतिहासिक घरेलू जीत!

Web Summary : जिम्बाब्वे ने अफ़ग़ानिस्तान को एक पारी और 73 रनों से हराया, 12 वर्षों में पहली घरेलू टेस्ट जीत हासिल की। ब्रैड इवांस के पांच विकेट और बेन कुरेन के शतक ने जिम्बाब्वे को शानदार जीत दिलाई, टेस्ट सफलता के लिए लंबा इंतजार खत्म हुआ।

Web Title : Zimbabwe Stuns Afghanistan in Test, Secures Historic Home Win!

Web Summary : Zimbabwe defeated Afghanistan by an innings and 73 runs, achieving their first home Test win in 12 years. Brad Evans' five-wicket haul and Ben Curran's century propelled Zimbabwe to a dominant victory, ending a long wait for Test success.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.