Join us
Daily Top 2Weekly Top 5

यहाँ के हम सिकंदर! आधी कांगारूंची शिकार; आता श्रीलंकेला दणका देत झिम्बाब्वेनं ठोकला सुपर ८ साठी शड्डू

साखळी फेरीत यजमान श्रीलंकेला पराभवाचा दणका देत झिम्बाब्वेनं अपराजित राहून सुपर ८ च्या लढती आधी आपल्यातील धमक दाखवून दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:34 IST

Open in App

ICC T20 World Cup 2026  Zimbabwe Beat Sri Lanka by 6 Wickets : ब्रायन बेनेटच्या अर्धशतकी खेळीसह सिकंदर रझाच्या दमदार खेळीच्या जोरावर  टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ब' गटातील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला आहे. आधी ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर काढल्यावर आता यजमान संघाला पराभूत करत झिम्ब्बाब्वेच्या संघाने आपल्या गटातून आपणच 'सिंकदर' असल्याचा शो दाखवून अव्वलस्थानी कब्जा करत सुपर ८ साठी शड्डू ठोकला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

निसंकाच्या अर्धशतकावर भारी पडली ब्रायन बेनेटची खेळी

 यजमान श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पथुम निसंकाच्या ६२ धावांच्या दमदार खेळीशिवाय पवन रतनायके याने केलेल्या २५ चेडूतील ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ७ बाद १७८ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा सलामीवीर  ब्रायन बेनेट याने दमदार अर्धशतक झळकावत संघाला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

अभिनेत्रींनाही टक्कर देणारी श्रीलंकन क्रिकेटरची ग्लॅमरस पत्नी; फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

 बेनेटच्या खणखणीत चौकारासह झिम्बाब्वेनं नोंदवला सलग चौथा विजय

धावांचा पाठलाग करताना ब्रायन बेनेट आणि  तडिवनाशे मारुमनी या झिम्बाब्वेच्या सलामी जोडीनं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. मारुमनी  २६ चेंजूत ३४ धावांची खेळी करून परतल्यावर रायन बुरी याने १२ चेंडूत २३ धावांची उपयुक्त खेळी करत  ब्रायन बेनेटला उत्तम साथ दिली. तो परतल्यावर कर्णधार सिकंदर रझानं आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवला.

ब्रायन बेनेटचा फिनिशिंग टच

या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४० चेंडूत ६९ धावांची भागीदारी रचत सामना झिम्बाब्वेच्या बाजूनं सेट केला. पण दशुन हेमंथानं सिकंदर रझाच्या खेळीला ब्रेक लावत सामन्यात ट्विस्ट आणले. रझानं २६ चेंडूत ४५ धावांची खेळी केली.  कर्णधाराने मैदान सोडल्यावर ब्रायन बेनेट याने फिनिशिंग टच देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने खणखणीत चौकार मारत संघाच्या सलग तिसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तर पावसामुळे एक सामना रद्द झाला होता.

नंबर वनची लढाई जिंकलीबेनेट याने या सामन्यात ४८ चेंडूत नाबाद ६३ धावांची मॅच विनिंग खेळी केली. 'ब' गटातून श्रीलंका आणि झिम्ब्बाब्वे दोन्ही संघांनी आधीच सुपर ८ चं तिकीट पक्के केले होते. पण नंबर वनच्या लढाईत झिम्बाब्वेच्या संघाने श्रीलंकेला पराभवाच पाणी पाजत यंदाच्या हंगामात मोठे उलटफेर करत नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Zimbabwe Stuns Sri Lanka, Secures Super 8 Spot After Australia Ouster

Web Summary : Raza's brilliance and Bennett's fifty powered Zimbabwe to victory against Sri Lanka in the T20 World Cup. After eliminating Australia, Zimbabwe dominated, showcasing their strength and securing a Super 8 berth with a commanding performance.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६श्रीलंकाझिम्बाब्वे