फिक्सिंग प्रकरणात फसला; बंदीची कारवाई झाली! आता कमबॅकची संधी मिळताच साधला मोठा डाव!

अँडरसनचा विक्रम मोडला, याबाबतीत फक्त सचिन त्याच्या पुढे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:08 IST2025-08-07T18:02:00+5:302025-08-07T18:08:08+5:30

whatsapp join usJoin us
ZIM vs NZ Zimbabwe Brendan Taylor Completed 10 Thousand Runs In International Cricket After Comeback From Ban In Fixing | फिक्सिंग प्रकरणात फसला; बंदीची कारवाई झाली! आता कमबॅकची संधी मिळताच साधला मोठा डाव!

फिक्सिंग प्रकरणात फसला; बंदीची कारवाई झाली! आता कमबॅकची संधी मिळताच साधला मोठा डाव!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

झिम्बाब्वेचा अनुभवी क्रिकेटर ब्रेंडन टेलर याने साडे तीन वर्षांनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केले आहे. अँटी डोपिंग आणि फिक्सिंग प्रकरणात बंदीची कारवाई झाल्यावर आता न्यूझीलंडविरुद्ध त्याला पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅकची संधी मिळाली. या संधीचं सोनं करताना त्याने मोठा डाव साधला आहे. अँडरसनचा विक्रम मोडत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. एक नजर टाकुयात झिम्बाब्वेच्या अनुभवी क्रिकेटर्सच्या खास कामगिरीवर 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 तो आपल्या संघाकडून १० हजार धावा करणारा तिसरा फलंदाज 

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उत्तम खेळीचा नजराणा पेश करताना त्याने ४४ धावांची खेळी केली. यासह या गड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी नोंदवणारा झिम्बाब्वेचा तो तिसरा फलंदाज ठरलाय. ब्रेंडन टेलरनं याआधी २०२१ मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. 

"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

अँडरसनचा विक्रम मोडला, याबाबतीत फक्त सचिन त्याच्या पुढे 

न्‍यूजीलंड विरुद्ध  ब्रेंडन टेलर ३५ वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मैदानात उतरताच त्याने इंग्लंडचा माजी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन याचा विक्रम मोडीत काढला. २१ व्या शतकात पदार्पण केल्यावर सर्वाधिक कालावधीत कसोटी खेळण्याच्या बाबतीत त्याने इंग्लंडच्या दिग्गजाला मागे टाकले आहे. अँडरसन याने २२ मे, २००३ ते १२ जुलै, २०२४ या कालावधीत २१ वर्षे आणि ५१ दिवस कसोटी क्रिकेट खेळल्याचा रेकॉर्ड आहे. १९८९ नंतर फक्त सचिन तेंडुलकर असा आहे ज्याची कसोटी कारकिर्द ब्रेंडन टेलरपेक्षा अधिक आहे. भारताच्या दिग्गजाची कसोटी कारकिर्द ही २४ वर्षे एक दिवस इतकी राहिली आहे.

 

दोन वेळा निवृत्तीनंतर घेतला 'यू टर्न'

ब्रेंडन टेलर याने २००४ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून झिम्बाब्वे संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते. झिम्बाब्वेकडून तिन्ही प्रकारात त्याने  २८४ सामने खेळले आहेत. फिक्सिंग प्रकरणातील बंदीशिवाय या क्रिकेटनं दोन वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण आपला निर्णय बदलत त्याने पुन्हा झिम्बाब्वे संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: ZIM vs NZ Zimbabwe Brendan Taylor Completed 10 Thousand Runs In International Cricket After Comeback From Ban In Fixing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.