Join us
Daily Top 2Weekly Top 5

झहीर खानने केली दिवाळीला पूजा; तर चाहते म्हणाले, काफिर...

मुंबई : सध्याच्या घडीला दिवाळीचा ज्वर चांगलाच चढलेला आहे. लोकांनी हा सण साजरा करण्यासाठी बरीच तयारी केली आहे. फटाके, ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 16:36 IST

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला दिवाळीचा ज्वर चांगलाच चढलेला आहे. लोकांनी हा सण साजरा करण्यासाठी बरीच तयारी केली आहे. फटाके, नवीन कपडे, फराळ या गोष्टींमुळे दिवाळीचा आनंद सारेच लुटत आहे. दिवाळीमध्ये बऱ्याच जणांच्या घरी पुजाही केली जाते. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने आपल्या घरीही पत्नीबरोबर पूजा केली. त्यावेळी काही जणांनी त्याला काफिर म्हटले आहे. त्याचबरोबर बऱ्याच चाहत्यांनी त्याला सल्लेही दिले आहेत.

झहीर आणि त्याची पत्नी सागरिका घागटे यांनी दिवाळीच्या निमित्ताने घरी एक पूजा केली. यानंतर झहीरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये सागरिकाच्या हातामध्ये पूजेचे ताट आहे आणि तिच्या बाजूला झहीर बसला आहे. हा फोटो शेअर केल्यावर झहीर ट्विटरवर ट्रोल झालेला पाहायला मिळत आहे. काही जणांनी झहीरला काफिर म्हटले आहे, तर काही जणांनी पूजा केल्यावर नमाजही पडं, असा सल्लाही दिला आहे. काही चाहत्यांनी हिंदू लोकं मुस्लीम लोकांचे सण साजरे करत नाहीत, असंही म्हटलं आहे.

 

 

 

टॅग्स :झहीर खानदिवाळी