मुंबई, दि. 14 - भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 27 नोव्हेंबर रोजी हे दोन्ही लव्हबर्ड विवाहबंधनात अडकणार आहेत. एप्रिल महिन्यात त्यांनी आपला साखरपुडा उरकला होता. त्यानंतर तब्बल सात महिन्यानंतर ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यानंतर त्यांच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. काही निवडक लोकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. यानंतर मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी स्वागत सोहळा होणार आहे. लग्नसोहळ्याचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही. पण तूर्तास या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्यातील प्रेमसंबध युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नात दोघे एकत्र दिसल्यानंतर समोर आले होते. या समारंभात दोघांनी दीर्घकाळ एकत्र घालवला. दोघांबाबत प्रसिद्ध झालेल्या वृतांनुसार, माजी भारतीय क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचा मुलगा अंगद बेदी यांनी जहीर आणि सागरिकाची भेट घडवून आणली होती. टाईम्स ऑफ इंडियाला बोलताना सागरिका म्हणाली होती की, झहीर खान लग्नाची तयारी सिक्रेटली प्लॅन करत आहे.काही दिवसांपूर्वी सागरिकाने तिच्या लग्नाचा न ठरलेला प्लान शेअर केला आहे. अद्याप लग्नाची कुठलीही तयारी सुरु झालेली नाही, असे तिने म्हटले होते. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण अद्याप आम्ही कुठलीही शॉपिंग केलेली नाही. अद्याप लग्नाचा हॉलही बुक झालेला नाही. ही सगळी तयारी करताना ताण येतो. कारण जेव्हा केव्हा आम्ही याबद्दल बोलतो, तेव्हा आता फार वेळ उरलेला नाही, असे आमच्या लक्षात येते. आता या इतक्या कमी वेळात सगळे कसे करता येईल, याचा विचार आम्ही चालवला आहेह्ण, असे सागरिका म्हणाली होती.क्रिकेट आणि बॉलिवूडचे कनेक्शन सर्वांनाच ठाऊक आहे. हरभजन-गीता बसरा, युवराज-हेजल यांच्याप्रमाणे आता झहीर-सागरिका एक कनेक्शन पक्के होणार आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- झहीर खान-सागरिका घाटगेच्या लग्नाचा ठरला मुहूर्त!
झहीर खान-सागरिका घाटगेच्या लग्नाचा ठरला मुहूर्त!
भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 19:42 IST