Zaheer Khan Part Ways With Lucknow Super Giants : IPL च्या आगामी हंगामाआधी झहीर खान याने लखनौ सुपर जाएंट्सची साथ सोडली आहे. २०२५ च्या हंगामात झहीर खान याची टीम इंडियाचा विद्यमान कोच गौतम गंभीर याच्या जागी संजीव गोएंका यांच्या मालकीच्या LSG संघाच्या ताफ्यात मेंटॉरच्या रुपात नियुक्त करण्यात आली होती. फ्रँचायझी संघाने माजी जलदगती गोलंदाजासोबत २ वर्षांचा करार केला होता. दुसऱ्या हंगामाची सुरुवात होण्याआधीच झहीर खान या ताफ्यातून बाहेर पडला आहे. नेमकं काय घडलं? कोणत्या कारणामुळे त्यानं हा निर्णय घेतलाय? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
झहीर खान याची LSG तील एन्ट्री अन् लक्षवेधी भूमिका
झहीर खान याने ऑगस्ट २०२४ मध्ये लखनऊ सुपरजायंट्ससोबत दोन वर्षांचा करार केला होता. त्याच्याकडे संघ बांधणी अन् संघाची कामगिरी उंचावण्यासाठी रणनिती तयार करण्याची प्रमुख जबाबदारी होती. २०१८ ते २००२२ या काळात मुंबई इंडियन्ससोबत त्याला कामाचा अनुभव होता. गौतम गंभीरची जागा घेतल्यानंतर झहीर खान याने गत हंगामासाठी संघ बांधणी करताना काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात रिषभ पंतवर लागलेल्या विक्रमी बोलीचाही समावेश होता. एवढेच नाही तर मिचेल मार्श आणि मार्करम या जोडीचा ओपनिंगचा यशस्वी प्रयोग अन् निकोल पूरनचा योग्य वापर करून घेण्यात तो यशस्वी ठरला. पण गत हंगामात LSG च्या संघाला १४ पैकी फक्त ६ सामन्यातच विजय मिळवता आला.
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
नेमकं काय बिनसलं?
ESPN Cricinfo च्या वृत्तानुसार, LSG संघाचा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर आणि संघ मालक संजीव गोयंका यांच्यासोबतच्या मतभेदामुळे झहीर खान याने LSG च्या ताफ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. गत हंगामात संघाच्या खराब कामगिरीत या तिघांचे विचार न पटणे हे देखील एक कारण असल्याची गोष्ट आता समोर येत आहे. IPL च्या आगामी हंगामाआधी झहीर खान नव्या संघाच्या ताफ्यातून नवी भूमिका बजावताना दिसणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Zaheer Khan Makes Shocking Exit From LSG After Disagreement With Owner Sanjeev Goenka Reports
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.