Join us

चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट

चहलसोबत बिनसल्यावर ट्रोल झाली, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 20:06 IST

Open in App

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा ही जोडी फुटली असली तरी यातील एका नावासोबत दुसरा चेहराही चर्चेत येतो. धनश्री वर्माला घटस्फोट दिल्यानंतर चहल सातत्याने आरजे माहवशसोबत स्पॉट झाला आहे. दोघांची जोडी जमलीये, अशी चर्चाही रंगली. आता धनश्री वर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा बिग बॉस विजेत्या लोकप्रिय चेहऱ्यासोबत नृत्य करताना दिसत आहे. या दोघांमध्ये आणखी एक चेहराही दिसतोय. धनश्रीचा व्हायरल अंदाज हा क्रिकेटर युजवेंद्र चहलला जळवण्यासाठी आहे का? असा प्रश्नही काहींना पडू शकतो. पण त्यामगची गोष्ट यापेक्षा वेगळी आहे. जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

खास पार्टीत धनश्रीचे ठुमके

धनश्री वर्माचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात ती स्टँडअप कॉमेडियन आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा असणाऱ्या मुनव्वर फारुकी याच्यासोबत डान्स करताना दिसतीये. या दोघांशिवाय या व्हिडिमध्ये आणखी एक सुंदरीची झलकही पाहायला मिळते. हा चेहरा म्हणजे मुनव्वर फारुकीची पत्नी मेहजबीन कोटवाला आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित पार्टीत धनश्रीनं हजेरी लावली होती. त्यावेळी तिने बर्थडे गर्लसह तिच्या पतीसोबत ठुमके लगावल्याचे पाहायला मिळाले.

धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा

चहलसोबत बिनसल्यावर ट्रोल झाली, आता...

धनश्री वर्मा ही एक लोकप्रिया डान्स कोरिओग्राफरच्या रुपात ओळखली जाते. बर्थडे पार्टीत ती 'भूल चूक माफ' चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसली. या व्हिडिओमध्ये आधी मेहजबीन तिच्या डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसते. त्यानंतर मुनव्वर फारुकी या दोघींची पार्टी जॉईन करताना पाहायला मिळते. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ हा  धनश्री वर्मा क्रिकेटर चहलला जळवण्याचा प्रयत्न करतीये का? असा प्रश्न पडू शकतो. पण ते तसं नाही. चहलसोबत बिनसल्यावर तिला ट्रोलचा सामनाही करावा लागला होता. आता तिच्या व्हायरल व्हिडिओवरही अनेक प्रतिक्रिया उमटताहेत. थोडक्यात जे झालं गेलं ते विसरून ती आधीप्रमाणेच आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतीये, असे चित्र या व्हिडिओतून दिसून येते.

टॅग्स :सोशल व्हायरलयुजवेंद्र चहलऑफ द फिल्डव्हायरल व्हिडिओ