Join us

Yuzvendra Chahal Kuldeep Yadav Fight Video, IPL 2022 DC vs RR: चहल-कुलदीपमध्ये मैदानातच तू तू मैं मैं? चहलने त्याच्या डोक्यात फटका मारताच...

दिल्लीच्या फलंदाजीच्या वेळी घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 16:02 IST

Open in App

Yuzvendra Chahal Kuldeep Yadav Fight Video, IPL 2022 DC vs RR: दिल्ली विरूद्ध राजस्थान सामना हा एका विचित्र प्रकारामुळे प्रचंड चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला शेवटच्या सहा चेंडूत ३६ धावा हव्या होत्या. रॉवमन पॉवेलने पहिल्या तीन चेंडूत तीन षटकार लगावले. त्यातील तिसरा चेंडू हा कमरेच्या वर असल्याने नो बॉल असायला हवा होता. पण पंचांनी नजरचुकीमुळे तो नो बॉल देण्यास नकार दिला. त्यानंतरच युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यात एक प्रकार घडला.

नो बॉलच्या वादानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याने चिडून फलंदाजांना खेळ मध्यातच सोडून परत येण्याचा इशारा केला. त्याचा इशारा पाहून कुलदीप यादव माघारी निघाला. त्यावेळी युजवेंद्र चहलने त्याला अडवलं. त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण पंतच्या रागामुळे कुलदीप चहलचं ऐकत नव्हता. अखेर मैत्रीच्या नात्याने, हक्काने युजवेंद्र चहलने कुलदीपला थेट हेल्मेटवर फटका मारत फलंदाजीला जाण्यास सांगितले.

दरम्यान, या प्रकारानंतर पंचांच्या चुकीच्या निर्णयावरून टीकेची झोड उठली. परंतु IPL नियमन समितीने पंचांवर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, रिषभ पंत, शार्दुल ठाकूर यांना गैरवर्तणुकीसाठी दंड ठोठवला. तर कोचिंग स्टाफमधील प्रवीण अमरे यांना एका सामन्याची बंदी घालण्यात आली.

टॅग्स :आयपीएल २०२२कुलदीप यादवयुजवेंद्र चहलदिल्ली कॅपिटल्स
Open in App