Yuzvendra chahal Dhanashree Verma Latest News: भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सातत्याने होत आहे. या चर्चेला रविवारी (४ जानेवारी) हवा मिळाली, जेव्हा चहल आणि धनश्रीने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
युजवेंद्र चहल आणि धनश्री शर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही वर्षात अनेकदा झाल्या. सोशल मीडियावर याबद्दल वेगवेगळी कारणेही चर्चेत आली.
चहलने धनश्रीसोबतचे सर्व फोटो केले डिलीट
दरम्यान, धनश्री आणि चहलने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे समोर आले. इतकंच नाही, तर चहलने धनश्रीसोबतचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून डिलिट केले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दोघांच्या घटस्फोटाची औपचारिक घोषणा व्हायचेच बाकी राहिले आहे. घटस्फोटाबद्दलच्या चर्चांवर युजवेंद्र चहल किंवा धनश्री वर्माकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने ११ डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले होते. त्यानंतर २०२३ मध्ये धनश्रीने इन्स्टाग्रामवरील तिच्या हॅण्डलवरून चहल आडनाव काढले होते. त्यानंतर तिने धनश्री हेच नाव ठेवले.
त्यावेळीही दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, युजवेंद्र चहलने या अफवा असल्याचे म्हटले होते.
चहल आणि धनश्रीची लव्हस्टोरी
धनश्री वर्माने झलक दिखला जा ११ या कार्यक्रमात युजवेंद्र चहल आणि तिची लव्हस्टोरी सांगितली होती. लॉकडाऊन असताना युजवेंद्र चहलने धनश्रीला डान्स शिकण्यासाठी संपर्क केला होता. धनश्री डान्स शिकवण्यासाठी तयार झाली. नंतर दोघांच्या भेटी वाढल्या आणि दोघे प्रेमात पडले होते. नंतर त्यांनी लग्नही केले.
युजवेंद्र चहल संघातून बाहेर
युजवेंद्र चहल सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. जानेवारी २०२३ मध्ये त्याने भारतीय संघाकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर ऑगस्ट २०२३ मध्ये अखेरचा टी२० सामना खेळला होता. आयपीएल २०२५ साठी पंजाब किग्जने त्याला १८ कोटी रुपयात खरेदी केले आहे.
Web Title: yuzvendra Chahal Dhanashree Verma: Both unfollowed each other, Chahal...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.