Join us

पत्नी हेजल किचने जगजाहीर केला युवराज सिंगचा सर्वात मोठा दोष; पाहा व्हिडीओ

स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग कामगिरीबरोबरच प्रेमळ स्वभावासाठी ओळखला जातो. पंजाब संघाकडून तो स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 09:46 IST

Open in App

नवी दिल्ली : स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग कामगिरीबरोबरच प्रेमळ स्वभावासाठी ओळखला जातो. पंजाब संघाकडून तो स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा करत आहे. भारतीय संघाकडून सध्या तो खेळत नसला तरी त्याच्या फॅन्सची संख्या कमी झालेली नाही. मात्र, पत्नी हेजल किचने एक व्यक्ती म्हणून त्याच्यातील सर्वात मोठा दोष जगाला सांगितला आहे. 

हेजलने  "Miss Field" या वेब सीरिजमध्ये युवराजबद्दल बरेच काही सांगितले. तिने सांगितले की,''युवराज कधी कोणाबद्दल वाईट उद्गार काढलेले नाही आणि त्यामुळेच मी त्याच्या प्रेमात पडली. मात्र, हाच त्याचा सर्वात मोठा दोष आहे." 

हेजल आणि युवराज यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न केले. ती पुढे म्हणाली,'' तो नेहमी समोरच्या व्यक्तीतील चांगुलपणा पाहतो. पण, ती व्यक्ती तशीच असेल, असे नाही. युवराज मनाने खूप चांगला आहे." या व्यतिरिक्त हेजलने युवराजबद्दल बरच काही या मुलाखतीत सांगितले आहे. संपूर्ण मुलाखतीसाठी पाहा हा व्हिडीओ...  युवराजने मंगळवारी विजय हजारे चषक स्पर्धेत रेल्वेविरुद्ध 121 चेंडूंत 96 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे पंजाबने 58 धावांनी विजय मिळवला. विजय हजारे स्पर्धेतील मागील पाच सामन्यांत त्याने अनुक्रमे 48, 41, 6, 26 आणि 96 धावा केल्या आहेत.  

टॅग्स :युवराज सिंगबीसीसीआय