Join us
Daily Top 2Weekly Top 5

Yuvraj Singh's Retirement: 'या' खेळाडूमध्ये युवी पाहतो स्वतःची छबी!

Yuvraj Singh's Retirement:आपल्या तडाखेबाज खेळीनं क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या युवराज सिंगनं सोमवारी आंतरराष्ट्रीय व प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 15:00 IST

Open in App

मुंबई : आपल्या तडाखेबाज खेळीनं क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या युवराज सिंगनं सोमवारी आंतरराष्ट्रीय व प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवराजच्या नावावर 2007चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, 2011चा वन डे वर्ल्ड कप आणि 19  वर्षांखालील वर्ल्ड कप आहेत आणि हे तीनही वर्ल्ड कप जिंकणारा तो एक खेळाडू आहे. सध्याच्या भारतीय संघात कोणत्या खेळाडूत तू स्वतःची छबी पाहतोस, यावर युवीनं दिलेलं उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

युवराज सिंगने निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी अनेक सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, आशीष नेहरा यांच्यासह महान फलंदाज सचिन तेंडुलकरशीही चर्चा केली. युवीनं 40 कसोटी सामन्यांत 33.92 च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 304 सामने आहेत आणि त्यात त्याने 36.55च्या सरासरीनं 8701 धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 111 विकेट्सही आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 58 सामन्यांत 1177 धावा व 28 विकेट्स घेतल्या आहेत.

तो म्हणाला,'' रिषभ पंतमध्ये मी स्वतःची छबी पाहतो. त्याची खेळण्याची शैली आक्रमक आहे. त्याचे फटके वैविध्यपूर्ण आहेत. त्याला खेळताना पाहत असताना मला मीच दिसतो.''  

निवृत्तीनंतर युवराज करणार समाजासाठी काही तरी, काय ते जाणून घ्या!आता मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळानं कसं लढायचं, पडायचं आणि पुन्हा उठून कसं पुढे जायचं हे मला शिकवलं. यापुढे कॅन्सरग्रस्त रुग्णांची सेवा करणार असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. मला जास्त टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही, याची खंत आहे.  

युवराजनं निवृत्ती घेण्याचं कधी ठरवलं, हे आहे उत्तर!युवराजचा निवृत्तीचा निर्णय तडकाफडकी नक्की नव्हता. निवृत्ती घेण्याचा निर्णय हा वर्षभरापूर्वीच घेण्याचा विचार केला होता, असे युवीनं सांगितले.

टॅग्स :युवराज सिंगरिषभ पंत