Join us

Yuvraj Singh's Retirement: युवीला 'या' एका गोष्टीची राहील आयुष्यभर खंत!

Yuvraj Singh's Retirement: आपल्या तडाखेबाज खेळीनं क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या युवराज सिंगनं सोमवारी आंतरराष्ट्रीय व प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 14:35 IST

Open in App

मुंबई : आपल्या तडाखेबाज खेळीनं क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या युवराज सिंगनं सोमवारी आंतरराष्ट्रीय व प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वन डे क्रिकेटमध्ये तीनशेहून अधिक सामने नावावर असणाऱ्या युवीनं 8701 धावा चोपल्या आहेत. युवराजच्या नावावर 2007चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, 2011चा वन डे वर्ल्ड कप आणि 19  वर्षांखालील वर्ल्ड कप आहेत आणि हे तीनही वर्ल्ड कप जिंकणारा तो एक खेळाडू आहे. 

पण, निवृत्ती घेतल्यानंतर आयुष्यात एका गोष्टीची खंत नेहमी राहणार असल्याचे युवीनं सांगितले.  युवीनं 40 कसोटी सामन्यांत 33.92 च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 304 सामने आहेत आणि त्यात त्याने 36.55च्या सरासरीनं 8701 धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 111 विकेट्सही आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 58 सामन्यांत 1177 धावा व 28 विकेट्स घेतल्या आहेत.

तो म्हणाला,'' 17 वर्षांच्या कारकिर्दीत जास्त कसोटी सामने खेळता न आल्याची खंत नेहमी राहील. आजारपणामुळे कसोटी खेळता आली नव्हती आणि ते माझ्या हातात नव्हतं.''

निवृत्तीच्या निर्णयाबाबत तेंडुलकरनं दिला युवीला 'हा' सल्ला!युवराज सिंगने निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी अनेक सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, आशीष नेहरा यांच्यासह एक नाव असं होतं की ते नसतं तर सर्वांना आश्चर्य वाटलं असतं. ते नाव म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकर... लहानपणापासून ज्याला आदर्श मानलं त्याच्यासोबत खेळण्याची संधी मला मिळाली. त्याच्यासोबत वर्ल्ड कप उंचावण्याचा मान युवीला मिळाला. त्यामुळे वर्ल्ड कपमधून निवृत्ती होण्यापूर्वी युवीनं आवर्जुन तेंडुलकरचा सल्ला घेतला. निवृत्तीचा निर्णय तुझ्यावर आहे, लोकांकडे लक्ष नको देऊस, हा सल्ला तेंडुलकरने त्याला दिला. 

टॅग्स :युवराज सिंगबीसीसीआय